मुंबई : राज्यातील ३३ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला ६० लाख हेक्टरच्यावर नुकसान झाले. पूर ओसरल्यानंतर आजारांचे संकट आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सगळ्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी तातडीची बैठक बोलावली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही बैठक पार पडणार असून महायुतीतील घटक पक्षांच्या प्रमुखासह मंत्र्यांना हजर राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.
राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने फटका दिला असून मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर शेत पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीची जोरदार मागणी लावून धरली आहे.