Jalgaon : कन्नड घाटात मोठा अनर्थ टळला; ५९ प्रवासी सुखरूप, Video 
महाराष्ट्र

Jalgaon : कन्नड घाटात मोठा अनर्थ टळला; ५९ प्रवासी सुखरूप, Video

छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे जाणाऱ्या एसटी बसच्या स्टिअरिंग यंत्रणेत बिघाड झाल्याने बसवरील चालकाचा ताबा सुटला.

Swapnil S

जळगाव : छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे जाणाऱ्या एसटी बसच्या स्टिअरिंग यंत्रणेत बिघाड झाल्याने बसवरील चालकाचा ताबा सुटला. ही घटना चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात रविवारी सकाळी घडली. बस रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याला धडकून अडकल्याने खोल दरीत कोसळण्यापासून बचावली. बसमधील तब्बल ५९ प्रवासी सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

स्टिअरिंगमध्ये अचानक बिघाड झाल्याने बस अनियंत्रित होऊन थेट रस्त्याच्या कडेला गेली. त्यानंतर बस कठड्याला अडकून थांबली. या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. बस कठड्याला अडकल्यानंतर काही प्रवाशांनी खिडक्यांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. अखेर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बसमधून बाहेर काढण्यात आले.

या घटनेत चार प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, बसच्या स्टिअरिंग यंत्रणेत नेमका कोणता बिघाड झाला, स्टिअरिंग रॉड तुटला की स्टिअरिंग जाम झाले, याबाबत अधिकृत तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

IND vs WI, 2nd T20I : गोलंदाजांची आज पुन्हा कसोटी; वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत आघाडी घेण्याचे भारतापुढे आव्हान

Mumbai : सहा धरणांच्या सुरक्षेचे ऑडिट; तज्ज्ञ समिती दोन महिन्यांत अहवाल सादर करणार, पालिका ४५ लाख ९० हजार रुपये खर्च करणार

Mumbai : पालिकेचा 'हॅलो ए वॉर्ड' उपक्रम; व्हॉट्सअ‍ॅपवर एआय-संचलित तक्रार निवारण सेवा सुरू

'वारी'वरील माहितीपटाचा जागतिक स्तरावर सन्मान