महाराष्ट्र

मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल लांबणीवर; 'या' तारखेला होणार सुनावणी!

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात मागील १७ वर्षांपासून मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्याची सुनावणी सुरु आहे.

Swapnil S

मुंबई : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लांबणीवर पडला आहे. विशेष एनआयए न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी या विस्तृत निकालाचं वाचन अद्याप पूर्ण झालेलं नसल्याने सुनावणी ३१ जुलैला निश्चित केली आहे.

न्यायालयाने यापूर्वी गुरुवारी ८ मे ची तारीख निश्चित केली होती. त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व आरोपी न्यायालयात हजर होते.

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात मागील १७ वर्षांपासून मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्याची सुनावणी सुरु आहे.

उन्हाळी सुट्टीनंतर ९ जून रोजी न्यायालये पुन्हा सुरू झाल्यानंतर तो बदलीचा आदेश लागू होणार होता. मात्र त्याआधीच बॉम्बस्फोटपीडित कुटुंबीयांतर्फे शाहिद नदीम यांनी लाहोटी यांच्या बदलीच्या आदेशावर आक्षेप घेतला होता. न्यायाधीशांच्या बदलीमुळे न्यायदानावर परिणाम होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती.

त्यानंतर काही दिवसांतच गुरुवारी उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलनी लाहोटी यांच्या बदलीचा आदेश स्थगिती देत त्यांचा कार्यकाळ ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला. विशेष न्यायालयाने खटल्याचा निकाला आज ८ मे ला निश्चित केला होता. मात्र निकालाचे कामकाज पूर्ण न झाल्याने खटल्याची सुनावणी ३१ जुलैला निश्चित केली.

प्रकरण काय?
२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावच्या मशिदीजवळ मोटारसायकलवर बॉम्बस्फोट होऊन ६ ठार, तर १०० हून अधिक नागरिक जखमी झाले होते. या प्रकरणी सध्या विशेष एनआयए न्यायालयात सुनावणी सुरू आहे.या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासह लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी उर्फ स्वामी अमृतानंद, सुधाकर चुतर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्याविरोधात हत्येशी संबंधित आयपीसीची कलमं, विस्फोटक कायदा, शस्त्रास्त्र कायदा, दहशतवाद विरोधी कायदा आणि युएपीए अंतर्गत खटला चालवण्यात आला. तर श्याम साहु, प्रविण टकल्की, रामजी कालसंग्रा आणि संदीप डांगे यांना यात फरार आरोपी करण्यात आले आहे. एकूण १३ आरोपी पैकी ५ आरोपींची सुटका झाली.

संजय राऊत यांना गंभीर आजार; बाहेर जाण्यास, गर्दीत मिसळण्यास बंदी, पोस्ट करीत म्हणाले - 'नवीन वर्षात भेटू'

New Rules From November 1: उद्यापासून बँकिंग, GST, आधार आणि पेन्शनमध्ये मोठे बदल; तुमच्यावर कसा होणार परिणाम? जाणून घ्या

Powai Hostage Case : 'तो आधी फ्रेंडली होता, नंतर...'; ओलिस ठेवलेल्या मुलीने सांगितला घटनेचा थरार

Powai Hostage Case : माजी मंत्री दीपक केसरकरांचा जुना व्हिडिओ व्हायरल; रोहित आर्यच्या प्रकल्पाचं केलं होतं कौतुक

कल्याणमध्ये ३० वर्षांपासून राहणाऱ्या नेपाळी महिलेचा पर्दाफाश; भारतीय कागदपत्रांसह मुंबई विमानतळावर घेतले ताब्यात