महाराष्ट्र

paragliding : धक्कादायक! साताऱ्यातील युवकाचा मनालीत पॅराग्लायडिंग करताना मृत्यू

कुलू-मनालीत पॅराग्लायडिंग (paragliding) करताना सेफ्टी बेल्ट निसटल्याने साताऱ्यातील सूरज शहा या तरुणाचा मृत्यू झाला

प्रतिनिधी

सध्या डिसेंबर महिन्यामध्ये अनेक तरुण-तरुणी देशातील अनेक ठिकाणी फिरायला येतात. वेगवेगळे अ‍ॅडव्हेंचर करण्यासाठी अनेक साहसी गोष्टी करतात. हिमाचल प्रदेशमधील कुलू-मनाली (kullu manali) हे सध्याच्या घडीला तरुणांचे सर्वाधिक आवडते ठिकाण आहे. पण, इथे होणाऱ्या साहसी खेळाच्या सुरक्षेचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. कारण, मनालीमध्ये पॅराग्लायडिंग (paragliding) करताना पॅराशूटचा बेल्ट निसटून खाली पडल्यामुळे युवकाचा मृत्यू झाला आहे. हा तरुण साताऱ्यातील (Satara) शिरवळ येथील असून त्याचे नाव सुरज शहा (Suraj Shah) असे आहे. ३० वर्षांच्या सुरजचे निधन झाल्यानंतर शिरवळमध्ये शोककळा पसरली आहे.

कुलू मनालीमध्ये पॅराग्लायडिंग हे पर्यटकांचे खास आकर्षण असते. अनेक पर्यटक खास पॅराग्लायडिंगसाठीच मनालीमध्ये सुट्ट्यांमध्ये येतात. मात्र, सुरजच्या मृत्यूने अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलूमधील पॅराग्लायडिंग साईट डोभी येथे हा अपघात झाला. डोभी येथील पॅराग्लायडिंग साईटवरून पायलटने उड्डाण घेतले. मात्र, थोड्याच वेळानंतर अपघात झाला. उंचावरून कोसळलेल्या सुरजचा मृतदेह शेतात आढळला. तर, यामध्ये पायलटदेखील जखमी झाला आहे.

श्रीनगर हादरले! फरिदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा पोलिस स्टेशनमध्ये भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू, दहशतवादी हल्ल्याचा संशय

बिहारमध्ये 'अब की बार भी' रालोआ सरकार; २४३ पैकी २०२ जागा जिंकून महाविजय; महाआघाडीला केवळ ३५ जागा

Navle Bridge Accident : पुणे अपघातप्रकरणी ट्रकचालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

विधानसभा पोटनिवडणुकीत संमिश्र निकाल; काँग्रेसला राजस्थान, तेलंगणात यश

Red Fort Blast : दिल्ली स्फोटातील दहशतवादी उमरचे घर स्फोटाद्वारे उडवले