Solapur : भोंदूबाबा मनोहर भोसलेला तीन दिवसांची कोठडी प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

Solapur : भोंदूबाबा मनोहर भोसलेला तीन दिवसांची कोठडी

सोलापूर जिल्ह्यातील कुडूवाडीत भोंदूगिरी आणि फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. व्यवसायात भरभराटीचे आमिष दाखवून एका तरुणाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भोंदू मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे यांना अटक करण्यात आली आहे.

Swapnil S

सोलापूर : जिल्ह्यातील कुडूवाडीत भोंदूगिरी आणि फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. व्यवसायात भरभराटीचे आमिष दाखवून एका तरुणाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भोंदू मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता माढा दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मनोहर भोसलेचा सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील घोटी येथे 27 एकरात पसरलेला आलिशान आश्रम असल्याची माहिती समोर आली आहे. येथे दर अमावस्येला मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत असे. बाबाला भेटण्यासाठी 11 हजार रुपयांची फी घेतली जात असल्याचंही समोर आलं आहे.

या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून अशा भोंदूगिरीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

एसटी प्रवाशांचे होणार विमानासारखे स्वागत; घटती प्रवासी संख्या रोखण्यासाठी परिवहन महामंडळाची राज्यव्यापी मोहीम

यंदाही पाऊस लवकर; २५ मेपर्यंत केरळात येणे शक्य, नैऋत्य वारे सक्रीय

खंडाळ्याच्या घाटातून होणार झपाझप प्रवास; मिसिंग लिंकचे उद्घाटन ठरल्यानुसार १ मे रोजी

Mumbai : बहाव्याच्या बहरानेही दिले पावसाचे शुभसंकेत; दादर येथील प्रमोद महाजन कला पार्कात बहावा बहरला

ड्रग्ज माफिया सलीम डोला तुर्कियेमध्ये ताब्यात; दाऊद इब्राहिमला मोठा धक्का; अमली पदार्थांच्या जाळ्याचा पर्दाफाश होणार