महाराष्ट्र

मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू

Swapnil S

जालना : सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यासह इतर मागण्यांसाठी मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे-पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे शनिवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.

राज्य सरकारने आरक्षणाच्या प्रशनावर दिलेले आश्वासन पाळले नसल्याने आपल्याला बेमुदत उपोषण सुरू करावे लागत आहे, असे जरांगे म्हणाले. यापूर्वी त्यांनी १३ जून रोजी आपले बेमुदत उपोषण स्थगित केले होते. समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी जरांगे यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिली होती.

सरकारने आपला शब्द पाळला नाही. त्यामुळे आपल्याला बेमुदत उपोषणाला बसावे लागत आहे. मृत्यू येईपर्यंत उपोषण सुरू ठेवले जाणार आहे. २९ ऑगस्ट रोजी एक महत्त्वाची बैठक आयोजित केली जाणार असून त्यामध्ये विधानसभेची आगामी निवडणूक लढवायची की नाही याबाबत मराठा समाज निर्णय घेणार आहे.

बेमुदत उपोषणादरम्यान ७ ते १३ ऑगस्ट या कालावधीत जरांगे राज्यव्यापी दौरा करणार आहेत. रुग्णवाहिकेतून दौरा करून आपण सभांना संबोधित करणार आहोत. त्यानंतर १४ ते २० ऑगस्ट या कालावधीत अंतरवाली सराटी येथे बैठकांची मालिका आयोजित करण्यात आली असून त्यावेळी विधानसभा निवडणुकीवर चर्चा केली जाणार आहे. उमेदवार उभा करण्याविरुद्ध समाजाने निर्णय घेतला तर आपण उमेदवार उभा करणार नाही, मात्र त्यानंतर मराठ्यांच्या आरक्षणाला जे विरोध करीत आहेत त्यांचा पराभव करण्यासाठी काम सुरू करणार आहोत, तर आरक्षणला समर्थन देणारे उमेदवार कसे निवडून येतील हेही पाहू, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

विधानसभेच्या निवडणुकीतील संभाव्य उमेदवार कोण असतील त्यांची माहिती गोळा करावी, म्हणजे १४ ते २० ऑगस्ट या कालावधीत त्या उमेदवारांबाबत चर्चा करणे शक्य होईल, अशी विनंतीही जरांगे यांनी मराठा समाजाला केली. सत्तारूढ महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी या आंदोलनाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. महायुतीला आपण २८८ उमेदवार उभे करावे असे वाटते तर महाविकास आघाडीला आपण पाठिंबा द्यावे असे वाटते, मात्र आपल्याला त्यांच्या युक्त्या माहिती आहेत. आपण त्यांची योजना यशस्वी होऊ देणार नाही, असेही जरांगे म्हणाले.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था