महाराष्ट्र

भाजपच्या आमदारांना घरी पाठविणार, मनोज जरांगे यांचा फडणवीसांना इशारा

समाजाला आरक्षण दिले नाही तर भाजपचे ११३ आमदार घरी गेलेच म्हणून समजा, अशा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी दिला आहे.

Swapnil S

बीड : मराठा समाज आता तुम्हाला लोळविल्याशिवाय राहणार नाही. समाजाला आरक्षण दिले नाही तर भाजपचे ११३ आमदार घरी गेलेच म्हणून समजा, अशा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी दिला आहे.

बीडमध्ये जरांगे यांच्या नेतृत्वाखाली घोंगडी बैठक पार पडली, त्यावेळी त्यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. यापुढे आपण २८८ मतदारसंघांत घोंगडी बैठक घेणार असल्याचेही जरांगे म्हणाले. आता आरपारची लढाई सुरू झाली आहे. कितीही आडवे येऊ द्या, आता थांबणार नाही. मराठे तुम्हाला लोळविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असा इशाराही त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिला.

गोरगरीब मराठ्यांनी जागे व्हावे, मार खायची वेळ आली तर खा, केस झाली तर होऊ द्या. पण मागे हटू नका, अशी संधी पुन्हा नाही. याचे सोने करा. मागे हटू नका. तुमची लेकरे तुमच्या हाताने बरबाद होऊ देऊ नका. स्वत:ची लेकरे आणि स्वतःची जात आता वाचवा.

भाजपमधल्या मराठ्यांना त्यांची लेकरे प्रश्न विचारणार आहेत. बाबा, तुम्ही ज्या पक्षात काम करताय त्या पक्षाचे नेते मला आरक्षण देत नाहीत, असे मनोज जरांगे म्हणाले.

जर सरकाने आरक्षण दिले नाही तर आपला नाइलाज आहे. गरीब मराठ्यांशिवाय यांचे पान हलू शकत नाही. निवडणुका जाहीर झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील मराठा समाजाची बैठक घ्यायची आहे. पाडायचे की निवडून आणायचे, प्रत्येक मतदारसंघात आपल्याला ७० हजारांचे मताधिक्य आहे, ते काटू शकणार आहेत का, पाच हजारांचे मताधिक्य ते काटू शकले नाहीत. एकदा जर मराठे रस्त्यावर आले तर फडणवीस तुम्हाला पाय ठेवायला जागा राहणार नाही, असा मोठा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. भाजपचे अनेक आमदार आमच्याकडे येऊन गेले आहेत. मी जर नावे सांगितली तर फडणवीस यांना चक्कर येईल, असा दावा मनोज जरांगे यांनी केला. पाडायचे की उभे करायचे हे ठरणार आहे. तुम्ही पाडून ताकद दाखवली. आता उभे केले तर निवडून आणून ताकद दाखवा, असेही ते म्हणाले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी