महाराष्ट्र

Manoj Jarange-Patil मनोज जरांगे याचं मराठा समाजाला आवाहन; म्हणाले, "बिगर कामाचे कळप..."

नवशक्ती Web Desk

मराठा समाजाच्याआरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांचा आज सांगलीत जाहीर सभा पार पडली. यावेळी मराठा समूदायाला संबोधित करताना ते म्हणाले की, आता आराम करुन चालणार नाही. नाहीतर आपल्या लेकरांचं वाटोळ होईल. आपल्या लेकरांना भविष्यात त्रास होईलस, असं आपल्याला काही करायचं नाही. यावेळी उपस्थित मराठा समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर घोषणा बाजी केल्याचं पाहायला मिळालं.

मराठा समाजा सर्वांची पोरं उस तोडायला गेल्यावर शाहाणा होणार का? आता गाफील राहून चालणार नाही. सगळ्यांनी चारी बाजंनी मराठ्याला घेरलं आहे. हे षडयंत्र मोडून काढण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेलं. गेल्या ७० वर्षापासून असलेला वेढा आपल्याला फोडावा लागेल. ज्या मराठा बांधवांना आरक्षण आहे. त्यानीही एकत्र घेण्याची गरज आहे. असं जरांगे म्हणाले.

बिगर कामाचे कळप एकत्र यायला लागले आहेत. पण एकटा मराठा समाज राज्यात ५० टक्यांच्या वरती आहे. त्यामुळे कितीही कळप एकत्र आले तरी टेंशन घेण्याची गरज नाही. आज जात वाचवणं आवश्यक आहे. त्यामुळे आरक्षण असलेल्या आणि नसलेल्या बांधवांनी एकत्र यावं. आपल्याला आव्हाण पेलायचं आहे असं म्हणत त्यांनी आपल्या मुलांना मोठं करण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं आहे.

मनोज जरांगे पुढे म्हणाले की, आपली जात उद्ववस्थ होता कामा नये, आपली जात आणि आपली पोरं उध्वस्त होता कामा नये. पोरं संपली तर जात संपली. आतापर्यंत जे आयोग झाले त्यांनी सांगितलं की पुरावे नाहीत, म्हणून आरक्षण नाही. पण, आता पुरावे सापडायला लागले आहेत. लाखोंच्या संख्येने पुरावे सापडत आहेत. असंही ते म्हणाले.

मराठा समाजाजाने ओबीसीमध्ये येण्यासाठी सर्व निकष पूर्ण केले आहेत. आपल्याला ओबीसीमध्ये समविष्ठ व्हायचं आहे. व्यावसायावरुन जाती निर्माण झाल्या. मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. क्षत्रिय असल्याने मराठ्यांना लढायचं देखील माहिती आहे आणि व्यवसाय शेती असल्याने देशाला अन्य धान्य पुरवणारी आपली जात आहे, असं जरांगे म्हणाले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त