महाराष्ट्र

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आणखी एकाने संपवलं जीवन; अकोल्याच्या तरुणाची पुण्यात आत्महत्या

अभय गजानन कोल्हे (वय १९) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो मूळचा अकोल्यातील आहे.

नवशक्ती Web Desk

मराठा आरक्षणावरुन राज्यात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. मराठा समाजासा आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे, प्रचार, उपोषणं आणि आंदोलन सुरु आहेत. इतकंच काय तर काही लोकांकडून आत्म्हत्यासारखं टोकाचं पाऊल देखील उचललं जात आहे. तरी देखील सरकारने आद्यपही कोणता ठोस निर्णय सांगितला नाही. म्हणून लोक नैराश्याच्या वाटेवर जात आहेत. अशातच आता आणखी एकानं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. अभय गजानन कोल्हे (वय १९) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो मूळचा अकोल्यातील आहे. त्यानं मराठा आरक्षणासाठी पुण्यात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

अभय कोल्हे हा मूळ अकोला शहरातील डाबकी रोड भागातील रहिवासी होता. त्याच्या वडिलांचे कोरोना काळात निधन झालं. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यानं त्याला आई व बहिणीची सतत चिंता होती. त्यात मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यानं तो विवंचनेत होता असं सांगण्यात येतं आहे. अभयने पुणे येथील चाकण भागात २ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच सांत्वन करून तरुणाच्या बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेलया मनोज जरांगे पाटील यांनी राज्य शासनाला २४ डिसेंबरपर्यंत मुदत देत आपलं उपोषण मागे घेतलं आहे. सरकारकडून मात्र २ जानेवारीची मुदत मागितली जात आहे. जरांगे यांनी मात्र मुदत वाढवून देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता राज्य सरकार २४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देत का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी