महाराष्ट्र

वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार, अशी चिन्हे दिसू लागताच राज्य सरकारने वंशावळ समितीला ३९ जून २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समाजाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

Swapnil S

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार, अशी चिन्हे दिसू लागताच राज्य सरकारने वंशावळ समितीला ३९ जून २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समाजाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गठित वंशावळ समितीस शासनाने ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये ही समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या कार्यकाळाला यापूर्वी ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर, न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आला होता. यास अनुसरून तालुकास्तरीय वंशावळ समितीस उच्चस्तरीय समितीच्या मुदतवाढीपेक्षा किमान सहा महिने अधिक मुदत देण्याचा विचार शासनाकडून करण्यात आला होता. त्यानुसार, आता या समितीचा कार्यकाळ ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. ही समितीस २५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयातील सर्व तरतूदी लागू राहतील, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर भीषण अपघात! Air Canada Express विमानाची फायर ट्रकला धडक; दोघांचा मृत्यू, अनेकजण जखमी, VIDEO

Mumbai : सिग्नलवरील मुलांसाठी आशेचा किरण! चेंबूरमध्ये 'सिग्नल स्कूल'ची सुरुवात, महापौरांच्या हस्ते उद्घाटन

Mumbai : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कायम; २५ हजारांवर कुत्र्यांचे निर्बीजीकरण; तरीही त्रास सुरूच

कच्च्या तेलाच्या आयातीचा खर्च वाढणार; इथेनॉल उद्योग २० टक्के मिश्रण पुरवण्यास सज्ज

दक्षिण मुंबईतील शौचालय प्रकल्प संशयाच्या भोवऱ्यात; महापालिका अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात