महाराष्ट्र

Maratha Reservation : मोठी बातमी!जुन्नरमध्ये मराठा आंदोलकाचा हार्टअटॅकने मृत्यू

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आणि अनेक आंदोलक मुंबईच्या दिशेने येत असतानाच एक दुःखद बातमी समोर आली आहे. मराठा समाजासाठी लढ्यात सहभागी असलेल्या एका आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

नेहा जाधव - तांबे

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आणि अनेक आंदोलक मुंबईच्या दिशेने येत असतानाच एक दुःखद बातमी समोर आली आहे. मराठा समाजासाठी लढ्यात सहभागी असलेल्या एका आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

मृत्यू झालेल्या आंदोलकाचं नाव सतीश देशमुख असून ते मूळचे बीड जिल्हयातील केज तालुक्यातील वडगावचे रहिवासी आहेत.

आंदोलनादरम्यान बिघडली तब्येत

सतीश देशमुख हे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनात सक्रिय सहभागी होते. ते मुंबई मोर्चासाठी निघाले असतानाच जुन्नरमध्ये अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी संध्या, मुलगा प्रसाद आणि वृद्ध आई पुष्पाबाई असा परिवार आहे.

या घटनेने मराठा समाजावर शोककळा पसरली आहे. आंदोलनाच्या उंबरठ्यावरच आपल्या सहकाऱ्याचा मृत्यू झाल्याने सहभागी आंदोलक भावनिक झाले आहेत. सतीश देशमुख यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात हळहळ व्यक्त होत आहे.

विघ्नहर्त्याचे राज्यात आगमन; सर्वत्र उत्साहाचे वातावरण

भारत-पाकिस्तानने एकमेकांची ७ विमाने पाडली; ट्रम्प यांचा नवा दावा, दोन्ही देशांमधील अणुयुद्ध थांबविल्याचाही पुनरुच्चार

सशस्त्र दलांनी दीर्घ संघर्षासाठी तयार राहावे; संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान

मुंबईत एसी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सप्टेंबरपासून; गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए प्रवास होणार जलद

जरांगे मुंबईकडे रवाना; मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई