महाराष्ट्र

हिंदी सक्तीविरोधात आता प्रत्यक्ष लढाईचे रणशिंग

इयत्ता पहिलीपासून मराठी-इंग्रजीपाठोपाठ तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यातील जनमत संतप्त झाले असून राज्यातील मराठी भाषाप्रेमींनी एकत्र येऊन प्रत्यक्ष आंदोलनाची तयारी चालवली आहे.

Swapnil S

मुंबई : इयत्ता पहिलीपासून मराठी-इंग्रजीपाठोपाठ तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यातील जनमत संतप्त झाले असून राज्यातील मराठी भाषाप्रेमींनी एकत्र येऊन प्रत्यक्ष आंदोलनाची तयारी चालवली आहे.

मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने आणि समविचारी व्यक्ती व संस्था यांच्या सहकार्याने तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात चालू असलेल्या मोहिमेत आता वातावरणनिर्मिती पूर्ण झाली आहे. आता प्रत्यक्ष आंदोलनाला सुरुवात होईल. त्याचे टप्पे दिवसभरात जाहीर करत आहोत. त्याची सुरूवात म्हणून या लढ्याच्या समन्वय समितीच्या सदस्यांची यादी प्रसिद्ध करत असल्याचे समन्वय समितीचे निमंत्रक व मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार, समितीचे सचिव आनंद भंडारे यांनी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.

या समन्वय समितीमध्ये रमेश पानसे- ग्राममंगल, चिन्मयी सुमित -मराठी शाळांच्या सदिच्छादूत, गिरीश सामंत - शिक्षण अभ्यासक, संस्थाचालक, डॉ. प्रकाश परब - भाषा अभ्यासक, सुजाता पाटील- प्रयोगशील शाळेच्या मुख्याध्यापक, विनोदिनी काळगी- प्रयोगशील शाळेच्या मुख्याध्यापक, महेंद्र गणपुले - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व माध्यमिक मुख्याधिकारी महामंडळ, रवींद्र फडणवीस - महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी - महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी, कौतिकराव पाटील - मराठवाडा साहित्य परिषद, किशोर दरक - शिक्षणतज्ज्ञ, सुशील शेजुळे - आम्ही शिक्षक सामाजिक संस्था, माधव सूर्यवंशी - शिक्षण विकास मंच, गोवर्धन देशमुख - अध्यक्ष मराठी एकीकरण समिती, संदीप कांबळे - अध्यक्ष युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय महाराष्ट्र, प्रसाद गोखले – मराठी शाळा टिकवल्याच पाहिजेत, फेसबुक समूह, भाऊसाहेब चासकर, संयोजक एटीएफ, प्रथमेश पाटील- पत्रकार, चंदन तहसीलदार- मराठी बोला चळवळ यांचा समावेश आहे.

पुरस्कार परतीचे वारे

हिंदी सक्तीच्या विरोधात राज्य सरकारने दिलेला पुरस्कार परत करत असल्याचे कवी हेमंत दिवटे यांनी जाहीर केले आहे. येत्या काळात हे पुरस्कार परतीचे वारे अधिक वेगाने वाहणार असल्याचे दिसून येत आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक