महाराष्ट्र

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

वरळीतील डोममध्ये राज्यभरातून मराठी माणूस एकवटला होता. दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने तो क्षण डोळ्यात मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी डोममध्ये मराठी एकजुटीची अलोट गर्दी उसळली होती. यावेळी वरळीतील आस्तिक बॅन्ड बाजा पथकाने विविध मराठी गाणी सादर केली. मराठी माणसांनी त्यांना प्रतिसाद दिला.

Swapnil S

मुंबई : वरळीतील डोममध्ये राज्यभरातून मराठी माणूस एकवटला होता. दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने तो क्षण डोळ्यात मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी डोममध्ये मराठी एकजुटीची अलोट गर्दी उसळली होती. यावेळी वरळीतील आस्तिक बॅन्ड बाजा पथकाने विविध मराठी गाणी सादर केली. मराठी माणसांनी त्यांना प्रतिसाद दिला.

आस्तिक बॅन्ड बाजा पथकाने कोळी गाणी सादर केली आणि कोळी गाण्यावर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह मनसे व शिवसेनेचे थिरकले.

यावेळी डोममधील वातावरण ठाकरेमय झाले होते. अनेक गाण्यांवर ठेका धरला. शर्मिला ठाकरे, किशोरी पेडणेकर, सुषमा अंधारे झिम्मा फुगड्या खेळल्या. तर राजू पाटील, अविनाश जाधव यांनी ठेका धरत दाद मिळवून दिली.

मांडी घालून बसले!

वरळीतील डोमची क्षमता ७ ते ८ हजार आसनाची आहे. शनिवारी मनसे व शिवसेनेकडून आयोजित विजयोत्सवात राज्यभरातून सैनिक एकवटले होते. त्यामुळे डोम खच्चाखच्च भरला. अखेर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी आलेल्यांना खुर्ची न मिळाल्याने खालीच मांडी घालून भाषण ऐकले. यावेळी टाळ्यांचा गजर, घोषणाबाजीने डोममधील वातावरण मराठीमय झाले होते.

Mumbai Ganeshotsav 2026 : गिरगावात १३३ वर्षांची परंपरा; नारळापासून साकारली १० फुटांची मूर्ती, Video

Mumbai : अंधेरीत साकारणार मीनाक्षी मंदिर; क्रांती गणेशोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

Mumbai : गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज; ३८३ कृत्रिम तलाव; १,१३२ जीवरक्षक तैनात

Mumbai : धोकादायक पुलांवर खबरदारी! गणेशोत्सवात सावधगिरीचे आवाहन; रेल्वे मार्गावरील पुलांचा समावेश

Mumbai : चेंबूरमध्ये चालत्या बेस्ट बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला, ४० प्रवासी बचावले