महाराष्ट्र

मराठवाड्यातील पहिली जागतिक दर्जाची रोसा रोबोटिक मशीन सेवेत

वृत्तसंस्था

केअरवेल सुपरस्पेशालिटी रुग्णालयात आरुष रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर (एआरजेआरसी) ची स्थापना करण्यात आली आहे. मराठवाडा व परिसरातील रुग्णांना वैद्यकीय तंत्रज्ञानातील सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखले जाणारे जागतिक दर्जाचे रोबोटिक सहाय्यक शस्त्रक्रिया सुविधा देण्यात येणार आहे. मराठवाड्यातील आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्णांना वाजवी दरात उच्चस्तरीय शस्त्रक्रिया व प्रगत आरोग्यसेवा प्रदान करण्यासाठी ही अत्याधुनिक प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या अत्याधुनिक युनिटविषयीची माहिती देताना डॉ. अभिषेक शिंदे म्हणाले, ''रोसा गुडघा प्रणालीचे अनेक फायदे आहेत. मराठवाड्यातील रुग्णांना मोठया शहरांमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे रुग्णाचे होणारे आर्थिक नुकसानही न होता सर्वोत्तम शस्त्रक्रिया उपचार मिळू शकतील.”तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अर्थसहायाविषयी बोलतांना डॉ. शिंदे म्हणाले की, बँकेने अत्यंत कमी वेळेत व माफक दरात कर्जाची मंजुरी दिली. याविषयी शाखा व्यवस्थापक जे ए बैनाडे म्हणाले कि महाराष्ट्र ग्रामीण बँके नेहमीच वैद्यकीय क्षेत्रासाठी कर्ज देण्यास अग्रेसर राहिली आहे. बँक डॉ. स्पेशल योजनेअंतर्गत पन्नास लाखांपर्यंत वैद्यकीय साहित्य खरेदी व रुग्णालय बांधकामांसाठी कोणतेही तारण न घेता कर्ज देते, तसेच क्लीन लोन अंतर्गत दहा लाख पर्यंत अर्थसहाय्य करते व तेही अगदी माफक दरात.

पुणे विमानतळावर अपघात; 'टग ट्रॅक्टर'ला धडकले एअर इंडियाचे १८० प्रवाशांनी भरलेले विमान

गोल्डन चान्स! या फेमस Electric Scooter वर मिळतोय तब्बल १० हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, जाणून घ्या डिटेल्स

फक्त ६५ हजारात मिळतीये Electric Scooter, चालवण्यासाठी लायसन्सचीही गरज नाही; जाणून घ्या रेंज अन् किंमत

कार्तिक आर्यनच्या नातलगांचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू, मुंबईत झाले अंत्यसंस्कार

होर्डिंग पॉलिसी लवकरच, तोपर्यंत नवीन होर्डिंगना परवानगी नाही