@dagadushethganpati/FB
महाराष्ट्र

पुण्यात ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्षाचे पठण

पुण्यात दरवर्षीप्रमाणेच यंदा महिलांनी पुण्यातील सुप्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण केले. या सामूहिक पठणात ३५ हजार महिला सहभागी झाल्या होत्या.

Swapnil S

पुणे : पुण्यात दरवर्षीप्रमाणेच यंदा महिलांनी पुण्यातील सुप्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण केले. या सामूहिक पठणात ३५ हजार महिला सहभागी झाल्या होत्या.

ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात मराठी संस्कृती जपत पारंपरिक वेशात मध्यरात्री १ वाजल्यापासून महिलांनी या अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमात हजेरी लावण्यास सुरुवात केली. गणरायाचा जयघोष करीत अथर्वशीर्ष पठणासोबत महाआरती करत पुण्यात महिलांनी स्त्री शक्तीचा एकच जागर केला.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर ओंकार जप, गणेश जागर गीत आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. महिला हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत गणरायाला नमन करीत होत्या.

पुण्यातील सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे १३२ व्या गणेशोत्सवानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता. या सोहळ्याला पुणे, मुंबई, कोल्हापूर, लातूर व नाशिक येथून महिला आल्या होत्या.

आजचे राशिभविष्य, ३ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

घशात खवखव आणि गिळताना त्रास होतोय? 'हे' उपाय ठरतील फायदेशीर

स्किनकेअर प्रॉडक्ट्स लावताना 'या' चुका करू नका; तज्ज्ञांनी सांगितले योग्य कॉम्बिनेशन

वॉशिंग मशीनमध्ये ॲल्युमिनिअम फॉईलचा गोळा टाकतात... पण का? जाणून घ्या भन्नाट फायदे

नूडल्स खाऊनही होईल वजन कमी! ट्राय करा लो-कॅलरी वेट लॉस नूडल्सची सोपी रेसिपी