माथेरानला जाण्याचा प्लॅन करताय? मग ही बातमी वाचाच; उद्यापासून चार महिने टॉय ट्रेन बंद, आता जायचं कसं? 
महाराष्ट्र

माथेरानला जाण्याचा प्लॅन करताय? मग ही बातमी वाचाच; उद्यापासून चार महिने टॉय ट्रेन बंद, आता जायचं कसं?

१५ जून ते १५ ऑक्टोबर या कालावधीत नेरळ ते अमन लॉजदरम्यानची नियमित टॉय ट्रेन सेवा स्थगित करण्यात आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात...

किशोरी घायवट-उबाळे

माथेरान ट्रिपचा प्लॅन करत असाल, तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मध्य रेल्वेने १५ जूनपासून नेरळ-अमन लॉजदरम्यान धावणारी नियमित टॉय ट्रेन सेवा चार महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यातील अतिवृष्टी आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ही सेवा तात्पुरती बंद राहणार असून, पर्यटकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.

चार महिने बंद राहणार नेरळ-अमन लॉज ट्रेन

मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, १५ जून ते १५ ऑक्टोबर या कालावधीत नेरळ ते अमन लॉजदरम्यानची नियमित टॉय ट्रेन सेवा स्थगित करण्यात आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणास्तव ही सेवा बंद ठेवली जाते.

माथेरान-अमन लॉज शटल सेवा सुरूच

नियमित सेवा बंद असली तरी पर्यटक आणि स्थानिक नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून माथेरान ते अमन लॉज आणि अमन लॉज ते माथेरान या मार्गावरील शटल ट्रेन सेवा सुरू राहणार आहे.

माथेरान - अमन लॉज शटल वेळापत्रक

  • सकाळी ८.२० - ८.३८

  • सकाळी ९.१० - ९.२८

  • सकाळी ११.३५ - ११.५३

  • दुपारी २.०० - २.१८

  • दुपारी ३.१५ - ३.३३

  • सायंकाळी ५.२० - ५.३८

शनिवार आणि रविवारी अतिरिक्त फेऱ्या

  • सकाळी १०.०५ - १०.२३

  • दुपारी १.१० - १.२८

अमन लॉज - माथेरान शटल वेळापत्रक

  • सकाळी ८.४५ - ९.०३

  • सकाळी ९.३५ - ९.५३

  • दुपारी १२.०० - १२.१८

  • दुपारी २.२५ - २.४३

  • दुपारी ३.४० - ३.५८

  • सायंकाळी ५.४५ - ६.०३

शनिवार आणि रविवारी अतिरिक्त फेऱ्या

  • सकाळी १०.३० - १०.४८

  • दुपारी १.३५ - १.५३

अमन लॉजपर्यंत कसे पोहोचाल?

नेरळ ते अमन लॉज रेल्वे सेवा बंद असताना प्रवाशांना रस्तेमार्गाचा पर्याय उपलब्ध राहणार आहे. मुंबई किंवा पुण्याकडून येणारे प्रवासी आधी नेरळ रेल्वे स्थानकावर उतरू शकतात. तेथून शेअर्ड टॅक्सीने दस्तुरी नाका येथे जाता येते.

दस्तुरी नाक्यावरून अमन लॉजपर्यंत पोहोचून शटल ट्रेनने माथेरान रेल्वे स्थानक गाठता येईल. तसेच पर्यटक स्वतःच्या वाहनानेही दस्तुरीपर्यंत जाऊ शकतात. वाहन पार्क केल्यानंतर अमन लॉजपर्यंत जाता येते.

घोडा, ई-रिक्षा आणि पायी जाण्याचाही पर्याय

दस्तुरी नाक्यावरून माथेरानपर्यंत जाण्यासाठी घोडा, ई-रिक्षा आणि पायी चालत जाण्याचे पर्यायही उपलब्ध आहेत. त्यामुळे नियमित टॉय ट्रेन सेवा बंद असली तरी माथेरान पर्यटनावर फारसा परिणाम होणार नाही, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Mumbai : राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दुचाकीस्वारांना भेट; पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त

लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची भररस्त्यात चाकू भोसकून हत्या; पोलिसांकडून तपास सुरू

Delhi Govindpuri Fire : आग लागली की लावली? CCTV मध्ये संशयास्पद महिला कैद; घातपाताची शक्यता, महिलेचा शोध सुरू

अविश्वास ठरावासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यकच; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा, गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षाला दिलासा

बनावट दाखल्यांचा घोटाळा उघडकीस; महसूल विभागाच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल