संग्रहित छायाचित्र  
महाराष्ट्र

स्वातंत्र्यदिनी मांसविक्री बंदी; कल्याणनंतर मालेगाव, संभाजीनगरमध्येही बंदीचा निर्णय

कल्याणमध्ये १५ ऑगस्टला मांस विक्रीचा वाद पेटला असताना आता मालेगाव आणि संभाजीनगरमध्येही मांस विक्री आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Krantee V. Kale

मुंबई : कल्याणमध्ये १५ ऑगस्टला मांस विक्रीचा वाद पेटला असताना आता मालेगाव आणि संभाजीनगरमध्येही मांस विक्री आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सणासुदीच्या काळात मांसविक्री बंद करण्याची मागणी जोर धरू लागली होती. हिंदू संघटनांकडून प्रशासनाला निवेदन देऊन अशी मागणी केली जात आहे. यामुळेच मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मांसविक्री बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

१५, २० आणि २७ ऑगस्टला पूर्ण दिवस सर्व प्रकारची मांसविक्री तसेच कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश मालेगाव महापालिकेने दिले आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ १५ ऑगस्टला सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुस्लिमबहुल जिल्ह्यांत हा आदेश लागू करण्यात आल्याने वाद उफाळण्याची शक्यता आहे.

Mumbai : मुंबई पोलिसांची फटाक्यांवर कडक नियमावली; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

पेंग्विनची भुरळ कायम! राणीच्या बागेला तीन वर्षांत ३५.३६ कोटींचा महसूल

भटक्या श्वान-मांजरींसाठी १२ कोटींचा खर्च अपेक्षित; नसबंदी, रेबीज लसीकरण मोहीम राबविणार

दिवाळी हंगामात विमान भाडे ३०० टक्क्यांनी वाढले

देशातील न्यायालयात आठ लाख अंमलबजावणी आदेश प्रलंबित; सर्वोच्च न्यायालयाची माहिती