महाराष्ट्र

वैद्यकीय अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर; एमबीबीएस व बीडीएसची पहिली गुणवत्ता यादी ७ ऑगस्टला

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या राज्य कोटा प्रवेशाचे वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना ३० जुलैदरम्यान नोंदणी करता येईल.

Swapnil S

मुंबई : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या राज्य कोटा प्रवेशाचे वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना ३० जुलैदरम्यान नोंदणी करता येईल. तर एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची अंतरिम यादी २ ऑगस्टल जाहीर होणार आहे.

नीट यूजी २०२५ परीक्षेचा निकाल १४ जून रोजी जाहीर झाला. यानंतर तब्बल एक महिन्याने वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) अखिल भारतीय कोट्याचे वेळापत्रक जाहीर केले. यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षानेही राज्य कोट्यांतर्गत एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीएनवायएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी या अभ्यासक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार विद्यार्थांना ३१ जुलैपर्यंत शुल्क भरून अर्ज नोंदणी करता येईल. तसेच १ ऑगस्टपर्यंत कागदपत्रांच्या प्रती संकेतस्थळावर अपलोड करता येणार आहेत.

आयुष अभ्यासक्रमाचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

आयुष अभ्यासक्रमांतर्गत असलेल्या बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस आणि निमवैद्यकीय अभ्यासक्रम असलेल्या बीएनवायएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी या अभ्यासक्रमाचे वेळापत्रक संबंधित परिषदेकडून जाहीर करण्यात आल्यावर त्यांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. मात्र या सर्व अभ्यासक्रमांसाठी नोंदणी एकत्रितच करण्यात येत असल्याची माहिती सीईटी कक्षाकडून देण्यात आली.

मालदीवसोबत संबंध अधिक मजबूत करण्यासाठी भारत तयार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

महायुतीत बेबनाव; संजय शिरसाट-माधुरी मिसाळ यांच्यात बैठकीवरून जुंपली

हिंजवडी आयटी पार्कचे वाटोळे; आयटी उद्योग बंगळुरू, हैदराबादला चालले; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संताप

शाळांचे सुरक्षा ऑडिट करणे बंधनकारक; केंद्राचे सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना सूचनावजा आदेश

अटल सेतूमुळे सरकार मालामाल! आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास