महाराष्ट्र

MHT-CET च्या अर्जात करता येणार दुरुस्ती; ११ लाख ४२ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी) घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत २७ फेब्रुवारी रोजी संपुष्ठात आली. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये काही चुका असल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी सीईटी कक्षाने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ५ ते ७ मार्चदरम्यान अर्जातील चुका दुरुस्त करता येतील.

Swapnil S

मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी) घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत २७ फेब्रुवारी रोजी संपुष्ठात आली. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये काही चुका असल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी सीईटी कक्षाने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ५ ते ७ मार्चदरम्यान अर्जातील चुका दुरुस्त करता येतील. यावर्षी प्रथमच पीसीएम व पीसीबी समूहासाठी प्रवेश परीक्षेच्या दोन संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार या दोन्ही संधी मिळून ११ लाख ४२ हजार ६१० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.

अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, बी. प्लॅनिंग, एम प्लॅनिंग (इंटिग्रेटेड) व कृषी या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी एमएचटी सीईटी परीक्षा बंधनकारक आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षेचे अर्ज करण्याची प्रक्रिया १० जानेवारीपासून सुरू करण्यात आली. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ फेब्रुवारी होती. यानंतर अर्ज करण्यास २० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तर दुसरी व अंतिम मुदतवाढ २४ फेब्रुवारीपर्यंत देण्यात आली होती. तर विलंब शुल्कासह २५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. २७ फेब्रुवारी रोजी नोंदणीची मुदत संपली. यावर्षी प्रथमच पीसीएम व पीसीबी समूहासाठी प्रवेश परीक्षेच्या दोन संधी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या दोन्ही संधी मिळून ११ लाख ४२ हजार ६१० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

एमएचटी सीईटीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरून अर्ज निश्चित केला आहे. अशा विद्यार्थांचे अर्ज भरताना अनावधानाने चुका झाल्या असल्यास अर्जात त्या दुरुस्तीसाठी सीईटी कक्षाने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना दुरुस्तीची सुविधा ५ ते ७ मार्चदरम्यान उपलब्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लॉगीनमध्ये जाऊन ही दुरुस्ती करावयाची आहे.

दोन्ही संधीच्या प्रवेश परीक्षेच्या तारखा

एमएचटी सीईटी (पीसीएम समूह) पहिल्या संधीची प्रवेश परीक्षा ११ ते १९ एप्रिल २०२६ दरम्यान होणार आहे. तर दुसऱ्या संधीची प्रवेश परीक्षा १४ ते १७ मेदरम्यान होणार आहे. एमएचटी सीईटी (पीसीबी समूह ) पहिल्या संधीची प्रवेश परीक्षा २१ ते २६ एप्रिलदरम्यान होणार आहे. तर दुसऱ्या संधीची प्रवेश परीक्षा १० ते ११ मेदरम्यान होणार आहे.

पीसीएमकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक

मागील वर्षीच्या प्रवेश नोंदणीच्या तुलनेत यंदा पीसीएम समूहाकडे विद्यार्थांचा कल दिसून येत आहे. २०२५ च्या एमएचटी सीईटीच्या वेळी पीसीएम समूहासाठी ४ लाख ६४ हजार २६२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यावर्षी पहिल्या संधीसाठी ४ लाख ७४ हजार ६५६ विद्यार्थांनी अर्ज केले आहेत. यामध्ये १० हजार ३९४ ने वाढ आहे.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी

एका फ्लॅटमुळे संपूर्ण इमारतीचा पुनर्विकास रोखू शकत नाही - मुंबई उच्च न्यायालय

Mumbai : पिसे पांजरपोळ जलबोगद्याला मंजुरी; पाणीगळती, पाणी चोरीच्या घटनांना लगाम