शिवसेनेतील संघर्ष सुप्रीम कोर्टात गेला आहे. कोर्टाने पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या आमदारांना निलंबित केल्यास एकनाथ शिंदे सरकार कोसळेल आणि त्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, असे भाकित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.मध्यावधी निवडणुका गृहीत धरून राष्ट्रवादीची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जयंत पाटील हे बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी शिंदे सरकार आणि राज्यपालांवर टीकास्त्र सोडले. ‘‘शिंदे गटाने बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बहुमत चाचणी करायला राज्यपालांनी त्यांना भाग पाडले,’’ असा गंभीर आरोप पाटील यांनी केला.
‘‘गुलाब नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली त्यामुळे मोठं नुकसान झालं. आझाद हे काँग्रेसचे मोठे नेते होते. त्यांची जम्मू-काश्मिरात घट्ट पकड होती. त्यामुळे अंतर्गत वादामुळे आझाद बाहेर पडले असतील, त्याचा फटका हा काँग्रेस सोबत राष्ट्रवादीला बसल्याची कबुली त्यांनी दिली.