नाशिक टीसीएस प्रकरण : मतीन पटेल नाशिक पोलिसांसमोर हजर; SIT कडून प्रश्नांची सरबत्ती 
महाराष्ट्र

नाशिक टीसीएस प्रकरण : मतीन पटेल नाशिक पोलिसांसमोर हजर; SIT कडून प्रश्नांची सरबत्ती

टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी महिला निदा खान हिला संभाजीनगर येथे बेकायदेशीरपणे आश्रय देणारा एमआयएम नगरसेवक मतीन पटेल सोमवारी अपेक्षेप्रमाणे नाशिक पोलिसांसमोर हजर झाला.

Swapnil S

नाशिक : टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी महिला निदा खान हिला संभाजीनगर येथे बेकायदेशीरपणे आश्रय देणारा एमआयएम नगरसेवक मतीन पटेल सोमवारी अपेक्षेप्रमाणे नाशिक पोलिसांसमोर हजर झाला. यावेळी त्याचे वकील उपस्थित होते.

पोलीस आयुक्तालयात एसआयटीकडून त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मतीन पटेल याने निदा खान हिला तिला छत्रपती संभाजीनगर येथे स्वतःच्या घरात लपवून ठेवत आश्रय दिल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मतीन पटेलविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतरच्या घडामोडीत नाशिक पोलिसांचे पथक त्याच्या शोधार्थ संभाजीनगरमध्ये गेले असता तो हाती लागू शकला नाही. पोलिसांच्या गुन्हे शाखेने मतीन पटेल यास थेट कायदेशीर नोटीस बजावली आणि तो आज शरण आला.

मतीन पटेल यांच्या चौकशीनंतर पोलीस त्यांना अटक करणार की त्यांची जामीनावर मुक्तता होणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता मिळालेली नाही.

Gurugram Hit-and-Run : महिला बाईक रायडरला कारची जोरदार धडक; फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Mumbai : मेट्रो ९ टप्पा २ साठी विशेष वाहतूक ब्लॉक; १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान सकाळी वाहतूक उशीरा सुरू होणार

Jio-Airtel चा Vi ला दणका; मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीवरून TRAI कडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?

Mumbai : दादर पूर्व स्टेशन परिसर होणार कोंडीमुक्त; टॅक्सी, बेस्टसाठी स्वतंत्र मार्गीका, टॅक्सी स्टँड

परिचारिकांना महिन्याला आठ सुट्या द्या; राज्य शासनाच्या धर्तीवर ४० तासांचा आठवडा करा, परिचारिका संघटनेने BMC चे लक्ष वेधले