महाराष्ट्र

जामनेरला संतप्त जमावाचा पोलीस ठाण्यावर हल्ला; १० पोलीस जखमी, १२ जण ताब्यात

Swapnil S

जळगाव : जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथील एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केलेल्या आरोपीला पोलिसांनी पकडल्यानंतर आरोपीला आमच्या ताब्यात देण्याची मागणी संतप्त जमावाने केली. यावेळी जमावाने पोलीस ठाण्यावर केलेल्या दगडफेकीत पोलीस निरीक्षक व १० पोलीस जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार व अश्रुधुराचा वापर करावा लागला. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी बारा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथील सहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना ११ जूनला घडली होती. याप्रकरणातील संशयित आरोपी सुभाष भील हा फरार होता. गुरुवारी पोलिसांनी त्याला भुसावळ येथे अटक केली. आरोपीस अटक केल्याची माहिती कळताच आरोपीला ताब्यात द्यावे, या मागणीसाठी जमावाने पोलीस ठाण्याला घेरले होते. प्रथम पोलिसांशी वाद घातल्यानंतर जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. या दगडफेकीत पोलीस निरीक्षक किरण शिंदेआणि १० पोलीस जखमी झाले. या दगडफेकीमुळे पोलीस ठाण्याच्या आवारात दगडांचा खच पडला होता. खिडक्यांची तावने फुटली संतप्त जमावाने काही मोटारसायकलींची मोडतोड करत त्यांना आग लावली.

या प्रकाराने जामनेर शहरात भीतीचे वातावरण पसरले होते. वातावरण चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव अधिकच आक्रमक झाला व त्याने पोलिसांवर प्रतिहल्ला केला. अखेर मोठ्या प्रमाणात पोलिसांची तसेच एसआरपीच्या दोन तुकड्या जामनेरमध्ये दाखल झाल्या आहेत.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था