महाराष्ट्र

आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय लवकरच? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना

राहुल नार्वेकर हे कायदेतज्ज्ञांशी चर्चा करण्याासाठी दिल्लीला रवाना झाले असल्याचं सांगितलं जात आहे.

नवशक्ती Web Desk

आमदार अपात्रतेविषयीच्या कारवाईला वेग आल्याच समोर येत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. येत्या दोन दिवसात ते ठाकरे आणि शिंदे गटाला नोटीस पाठवली जाणार असल्याची माहिती आहे. राहुल नार्वेकर हे कायदेतज्ज्ञांशी चर्चा करण्याासाठी दिल्लीला रवाना झाले असल्याचं सांगितलं जात आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीत १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत कायदेतज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर ते शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाला नोटीस देणार आहेत. असं सांगितलं जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी राहुल नार्वेकर यांच्यावर नाराजी व्यक्त करत त्यांना फटकारलं होतं. विधानसभा अध्यक्ष निर्णय घेण्यासाठी उशीर करत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. त्यामुळे आता नार्वेकरांकडून दोन्ही गटांना नोटीस पाठवली जाणार असल्याचं सांगितली जात आहे. याचं पार्श्वभूमीवर नार्वेकरांचा हा महत्वपूर्ण दौरा आहे. 'एबीपी माझा' ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

१६ आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या याचिकेवर सुनावणीसाठी दोन्ही गटांच्या प्रमुखांना आपली बाजू एक-दोन आठवड्यात मांडण्यासाठी ही नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती आहे.

मुंबईला अवकाळी पावसाचा तडाखा! राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा एसटीतच नोकरीची संधी

झाडांना दिव्यांच्या माळांनी जखडू नका! पर्यावरणप्रेमींचे मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांना भावनिक आवाहन

बालभारतीच्या पुस्तकांची छपाई कमी दर्जाच्या कागदांवर; उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

शक्तिपीठ महामार्गात बदलाचे संकेत; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती