महाराष्ट्र

संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा

आमदार निवासातील उपहारगृहातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हायरल चित्रफितीच्या आधारे मरिन ड्राईव्ह पोलिसांनी स्वतः तक्रार दाखल केली आहे. गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीचा मुद्दा सभागृहातही गाजला होता.

Swapnil S

मुंबई : आमदार निवासातील उपहारगृहातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हायरल चित्रफितीच्या आधारे मरिन ड्राईव्ह पोलिसांनी स्वतः तक्रार दाखल केली आहे. गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीचा मुद्दा सभागृहातही गाजला होता.

गायकवाड यांच्याविरोधात कलम ११५ (२), ३५२, आणि ३(५), कलमांतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांच्या तक्रारीवरून गायकवाड यांच्यासह आणखी एका व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आकाशवाणी आमदार निवासातील उपहारगृहातून गायकवाड यांनी मंगळवारी रात्री जेवण मागवले होते. त्यावेळी शिळी डाळ व भात त्यांना देण्यात आला होता. डाळीतून दुर्गंधी येत होती, असा आरोप गायकवाड यांच्याकडून करण्यात आला होता.

आमदार संजय गायकवाड यांनी शिळे जेवण दिल्याबद्दल उपहारगृहातील कर्मचाऱ्याला विचारणा केली. मात्र, उपहारगृहातील कर्मचाऱ्यांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यानंतर गायकवाड यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. तसेच त्याला बुक्के मारले. गायकवाड यांच्या मारहाणीची चित्रफित व्हायरल झाल्याने ते चर्चेचा विषय ठरले. यापूर्वीही मी उपहारगृहातील जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार केल्याचे संजय गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

गायकवाड यांच्या मारहाणीचा मुद्दा शिवसेनेचे (ठाकरे) आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. कर्मचाऱ्यांना मारता, हिंमत असेल तर मंत्र्याला मारा. अशा लोकांना तुम्ही पाठिंबा देणार का, अशा आमदारांचे निलंबन करा, अशी मागणी अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यावर या प्रकरणाची माहिती घेतली असून असे वर्तन योग्य नाही. भाजी खराब झाल्याचा वास येत होता. परंतु कर्मचाऱ्यांना मारहाण करणे योग्य नाही, असे फडणवीसांनी सांगितले. लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे योग्य नाही. अशा प्रकारच्या मारहाणीमुळे जनतेत चुकीचा संदेश जातो. त्यामुळे सभापतींनी याबाबत काय कारवाई करता येईल याचा निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्री फडणवीस विधान परिषदेत म्हणाले होते.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत