महाराष्ट्र

मराठी पाट्यांसंदर्भात मनसे पुन्हा आक्रमक; दुकानदारांना दिला पाट्या मराठातीत करण्याचा इशारा

कोर्टाने दिलेल्या डेडलाईन नंतरही राज्यात अजून काही ठिकाणी मराठी भाषेत दुकानाच्या पाट्या करण्याात आलेल्या नाही

नवशक्ती Web Desk

मुंबईतील सर्व दुकानांवरील पाट्या 25 नोव्हेंबरपर्यंत मराठीत असाव्यात, असा निर्णय कोर्टाने दिला होता. या निर्णयासंदर्भात अल्टिमेटम देणारे बॅनर्स आता चेंबूर स्टेशन परिसरात लावण्यात आले आहेत. मराठी पाट्यांच्या संदर्भात चार दिवसांचा कालावधी आता उरला, मराठी पाट्या करा नाहीतर मनसेचा खळखट्याक, असा मजकूर लिहून बॅनर्स मनसेकडून लावले आहेत. त्यामुळे मनसे पुढील काही दिवसात मराठी पाट्यांवरून आक्रमक होण्याची चिन्ह दिसत आहेत.

राज्यात मनसेने सुरुवातीपासून मराठी पाट्यांवरुन आक्रमक अशी भूमिका घेतली आहे. कोर्टाने देखील याबाबत निकाल दिला आहे. त्यात आता कोर्टाने दिलेल्या डेडलाईन नंतरही राज्यात अजून काही ठिकाणी मराठी भाषेत दुकानाच्या पाट्या करण्याात आलेल्या नाही. त्यामुळे मनसेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेचे प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी देखील याबद्दल कोर्टाचा आदेश सांगत किती दिवस उरले आहेत याबाबत इशारा दिला आहे.

'मराठी पाट्या' ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मागील अनेक वर्ष जो संघर्ष केला. त्याला आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली, असं राज ठाकरे म्हणाले आहे. तसंच दुकानदारांनी पण कोणत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा आणि इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरु नका, असा इशारा राज यांनी दिला होता.

महाराष्ट्रात असाल तर मराठीत इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं ह्यात विरोध करण्यासारखं काय होतं. तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही देखील केलाच पाहिजे. असो, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ह्या मुद्द्यावर संघर्ष केला, आता सर्वोच्च न्यायालयाने पण ह्यावर काही मूठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली आहे.असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

रेल्वे स्टेशनमध्ये दोन दिवस राहा फक्त दहा रुपयांत...आंदोलकांच्या व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल, वाशीतील एक्झिबिशन सेंटरमध्ये व्यवस्था

मराठा आंदोलकांनी केला चक्काजाम; जरांगे-पाटील यांच्या आवाहनानंतर रस्ता मोकळा

इशाऱ्यानंतर पालिका प्रशासनाचे नमते! फिरत्या शौचालयासह पुरवल्या इतर सुविधा; आंदोलकांसाठी पाण्याचे टँकर्सही अखेर उपलब्ध

Maratha Reservation Protest : मुंबईच्या रस्त्यांवर संगीत, नृत्य आणि कठपुतळीचा नाचही!