महाराष्ट्र

पुण्यात मराठी पाट्यांवरुन मनसे आक्रमक; जंगली महाराज रस्त्यावरील दुकानांच्या पाट्या फोडल्या

यावेळी पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचं देखील पाहायला मिळालं

नवशक्ती Web Desk

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची दिलेली मुदत संपली आहे. यानंतर पालिला प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. दरम्यान, मराठी पाट्यांच्या मुद्यावरुन मनसे आक्रमक झाल्याचं दिसू येत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुण्यातील जंगली महाराज रोडवर आज आंदोलन करण्यात आलं. इंग्रजी भाषेत असलेल्या दुकानांच्या पाट्यांची तोडफोट देखील करण्यात आली. मराठी पाट्यांप्रकरणी संतप्त मनसेकार्यकर्त्यांनी जंगली महाराज रोडवरील चार-पाच दुकानांवर लावण्यात आलेल्या इंग्रजी पाट्या फोडल्या.

मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचं देखील पाहायला मिळालं. यानंतर पोलिसांनी एका कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं आहे.

सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या निर्णयानुसार पुणे महापालिका हद्दीतील सर्व दुकाने व आस्थापनेवरील पाट्या मराठीत न केलेल्यांवर कायदेशीर कारवाई करावी. याबाबत मनसेकडून पत्र देखील देण्यात आलं होतं. तसंच महापालिकेने मराठी पाट्यांबाबत कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर आज मनसेकडून आक्रमक होत आंदोलन करण्यात आलं.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी