Photo : X (@amitrthackeray)
महाराष्ट्र

गणेशोत्सव काळातील परीक्षा पुढे ढकला; मनविसेची सांस्कृतिक मंत्र्यांकडे मागणी

अनेक शाळा-महाविद्यालयांनी गणेशोत्सव काळात परीक्षा आयोजित केल्या आहेत. गणेशोत्सव काळातील परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : अनेक शाळा-महाविद्यालयांनी गणेशोत्सव काळात परीक्षा आयोजित केल्या आहेत. गणेशोत्सव काळातील परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे करण्यात आली आहे. मुख्य सचिवांशी संपर्क साधून याबाबत आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश शेलार यांनी दिले आहेत.

'गणेशोत्सव' हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचा उत्सव असून त्याला 'राज्य महोत्सव' म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र अनेक शाळा-महाविद्यालयांनी याच काळात परीक्षा आयोजित केल्या आहेत. त्यामुळे गणेशोत्सव काळातील परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शेलार यांना निवेदन दिले.

निर्णयाचे उल्लंघन

धार्मिक सण व उत्सव कालावधीत चाचणी परीक्षांचे आयोजन न करण्याबाबत ठाणे महापालिकेने आदेश काढले आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी, शासन निर्णयाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याचे नमूद केले आहे.

गणपतीवर पर्जन्यवृष्टी; राज्यात सोमवारपासून पावसाचा जोर वाढणार

चाकरमानी चल्ले गावाक! रेल्वे, एसटी, आराम बस, खासगी गाड्या निघाल्या

मराठा आरक्षण : मनोज जरांगे-पाटील यांना सरकारचे चर्चेचे आवाहन

SRA बिल्डरांसाठी काम करते! मुंबई उच्च न्यायालयाने प्राधिकरणाला फटकारले

महाराष्ट्र, केरळच्या सरकारी कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन मिळणार