संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

मोदींची शरद पवारांवरील टीका निवडणुकीत भोवली, अजितदादांची कबुली

शरद पवार यांच्यावर काहीही बोलू नये, अशी विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात केली होती. पण, नरेंद्र मोदींनी प्रचारसभेत शरद पवारांचा उल्लेख 'भटकती आत्मा' केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्याचा मोठा फटका बसला, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

Swapnil S

नाशिक : शरद पवार यांच्यावर काहीही बोलू नये, अशी विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात केली होती. पण, नरेंद्र मोदींनी प्रचारसभेत शरद पवारांचा उल्लेख 'भटकती आत्मा' केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्याचा मोठा फटका बसला, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

छगन भुजबळ यांच्या येवला येथील कार्यालयात महायुतीची बैठक झाली. यावेळी महाराष्ट्रातील जागा कमी का झाल्या, याबाबत चर्चा करताना अजित पवार यांनी उपस्थितांना निवडणुकीच्या प्रचारावेळीचा किस्सा सांगितला. बैठकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातील पराभवाबाबत चर्चा झाली आहे. आगामी विधानसभेत नाशिक जिल्ह्यातून जास्तीत जास्त जागा कशा आणायच्या, याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली.

नरेंद्र मोदी म्हणाले, ‘भटकती आत्मा’

पुण्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भटकती आत्मा' असा उल्लेख करत शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले होते. महाराष्ट्रानंतर आता देश अस्थिर करण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. महाराष्ट्राला अशा ‘भटकती आत्म्यां’पासून वाचविले पाहिजे. महाराष्ट्रात महायुती मजबूत आहे, असे मोदी म्हणाले होते.

पवारांचा मार्मिक पलटवार

मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले की, "मोदी म्हणाले, आम्ही राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करतो, पण मर्यादा ठेवतो. माझा ‘भटकती आत्मा’ म्हणून त्यांनी उल्लेख केला. एका दृष्टीने बरे झाले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा कायम राहतो. हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला कधीच सोडणार नाही."

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, मुंबई पोलीस ठाम ; भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश