मान्सून दोन दिवसांत राज्यात होणार सक्रिय; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता  'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

मान्सून दोन दिवसांत राज्यात होणार सक्रिय; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि सोलापूरपर्यंत सोमवारी धडक दिल्यानंतर, राज्यातील मान्सूनची प्रगती मंगळवारी स्थिर होती.

Swapnil S

पुणे : कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि सोलापूरपर्यंत सोमवारी धडक दिल्यानंतर, राज्यातील मान्सूनची प्रगती मंगळवारी स्थिर होती. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून राज्याच्या आणखी काही भागांमध्ये सक्रिय होऊन पुढे सरकण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकणात मान्सूनचे आगमन झाले असून दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरच्या काही भागांतही पावसाने हजेरी लावली आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात आज पावसाच्या सरी

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागेल. विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही वादळी पावसाचा इशारा कायम आहे.

बुधवारी देखील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाच्या सरी हजेरी लावतील, ज्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, ज्या भागात अद्याप पाऊस सक्रिय झालेला नाही, तिथे कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका कायम राहील, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

मूळ मालकाला भरपाई दिल्याशिवाय प्रकल्पाग्रस्तांना जमिनीचे वाटप अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रल्हाद जोशी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर स्वीकारला पदभार

Mumbai : शिवाजी पार्कवर तरुणाईचा महासागर! ठाकरे बंधूंच्या विजय जल्लोष सभेला हजारोंची उपस्थिती; VIDEO

'ही केवळ सुरुवात, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे'; अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ चर्चेत

युनेस्कोकडून सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा; भारताच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा, जाणून घ्या इतिहास अन् वैशिष्ट्ये