MPSC ने संयुक्त परीक्षा पुढे ढकलली 
महाराष्ट्र

MPSC ने संयुक्त परीक्षा पुढे ढकलली; आता ४ व ११ जानेवारीला परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २१ डिसेंबर रोजी होणारी संयुक्त परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून आता ही परीक्षा पुढील वर्षी ४ आणि ११ जानेवारीला घेतली जाणार आहे.

Swapnil S

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २१ डिसेंबर रोजी होणारी संयुक्त परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून आता ही परीक्षा पुढील वर्षी ४ आणि ११ जानेवारीला घेतली जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय), राज्य कर निरीक्षक (एसटीआय) आणि सहायक कक्ष अधिकारी (एएसओ) यासाठी संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाते.

नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी ही एकत्रित २१ डिसेंबरला होणार आहे. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र गट ‘ब’ अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २१ डिसेंबरला होणार होती. जिल्हा पातळीवर परीक्षेची संपूर्ण जबाबदारी ही जिल्हाधिकारी आणि महसूल विभागाकडे असते. जिल्हाधिकाऱ्यांसह महसूल विभागातील सर्व कर्मचारी हे २१ डिसेंबरला मतमोजणीत व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे २१ डिसेंबरची संयुक्त पूर्व परीक्षा होणार की पुन्हा पुढे ढकलली जाणार, असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला होता. मात्र, आता २१ डिसेंबरची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून ती आता ४ जानेवारीला होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय), राज्य कर निरीक्षक (एसटीआय) आणि सहायक कक्ष अधिकारी (एएसओ) यासाठी संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाते. यंदा ६७४ पदांसाठी जाहिरात देण्यात आली. यामध्ये सहायक कक्ष अधिकारी ३, राज्य कर निरीक्षक २७९ पदे आणि पोलीस उपनिरीक्षकाच्या ३९२ पदांचा समावेश आहे. सुरुवातीला संयुक्त पूर्व गट ‘ब’ २०२५ (अराजपात्रित) परीक्षा ९ नोव्हेंबरला होणार होती. मात्र, महाराष्ट्राच्या काही भागात आलेल्या पूर परिस्थितीमुळे राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आली.

सदर निर्णयानुसार विषयांकित दोन्ही परीक्षेचा सुधारित दिनांक पुढीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ दिनांक ०४ जानेवारी २०२६ रोजी होणार असून महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.

"पटेल जिंकले तरी नेहरू PM कसे?" इतिहास सांगत अमित शहांचा काँग्रेसवर पलटवार

लाडक्या बहिणींना दिलासा; पात्र बहिणींसाठी योजना सुरूच राहणार, ८ हजार कर्मचाऱ्यांकडून रक्कम वसूल

‘५०% रक्कम भरा आणि दंड मिटवा’, सरकारचा मोठा निर्णय : दंडाची रक्कम FASTag मधून वसूल होणार

Nashik : त्र्यंबकेश्वरमध्ये आईनेच तब्बल ६ मुलांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस; जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

BCCI कडून अखेरच्या क्षणी IPL लिलाव यादीत मोठा बदल; माजी RCB खेळाडूसह नवीन ९ जणांचा समावेश