MPSC Protest Pune : प्रकृती बिघडली, तिघांचे उपोषण मागे 
महाराष्ट्र

MPSC Protest Pune : प्रकृती बिघडली, तिघांचे उपोषण मागे

पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर आपल्या हक्कांच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) तीन विद्यार्थ्यांची प्रकृती वेगाने खालावल्याने त्यांनी अखेर गुरुवारी मध्यरात्री आपले उपोषण मागे घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सलग नवव्या दिवशीही सुरू आहे.

Swapnil S

पुणे : पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर आपल्या हक्कांच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) तीन विद्यार्थ्यांची प्रकृती वेगाने खालावल्याने त्यांनी अखेर गुरुवारी मध्यरात्री आपले उपोषण मागे घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सलग नवव्या दिवशीही सुरू आहे. सलगच्या अन्नत्यागामुळे प्रकृती चिंताजनक बनलेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून ज्येष्ठांच्या आवाहनानुसार शुक्रवारी हे उपोषण मागे घेण्यात आले असले, तरी एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

पुण्यात तणावाचे वातावरण

दरम्यान, या आंदोलनामुळे पुण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी काल आंदोलनस्थळी दाखल होऊन एस. एम. जोशी पूल तातडीने मोकळा करण्याच्या सूचना आंदोलकांना दिल्या आहेत. पोलीस व्हॅनमधून वारंवार अनाउन्समेंट करून आंदोलकांना परिसर खाली करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, या भूमिकेवर विद्यार्थी अजूनही ठाम आहेत. आमदार रोहित पवार स्वतः आंदोलनस्थळी उपस्थित असल्याने या परिस्थितीतील गांभीर्य अधिक वाढले आहे.

लढा अधिक तीव्र करणार

या सर्व घडामोडींवर बोलताना रोहित पवार यांनी राज्य सरकार आणि लोकसेवा आयोगावर तीव्र शब्दांत निशाणा साधला. काही विद्यार्थ्यांची तब्येत खालावल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले असले, तरी हा सत्याग्रह असाच सुरू राहील. एमपीएसचीचे अध्यक्ष विवेक भीमनवार या भ्रष्ट अध्यक्षांची आपण विकेट घेत नाही, तोपर्यंत या आंदोलनाची सांगता होणार नाही. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी हा लढा येणाऱ्या काळात अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिल्लीची नाकेबंदी, झुरळे आक्रमक; रेल्वे रद्द, मेट्रो, इंटरनेट सेवा बंद, ड्राय-डे जाहीर; परवानगी नाकारली तरी CJP आंदोलनावर ठाम

जेन-झीला घाबरून सरकारची आणीबाणी; संपूर्ण देशच बंद करून टाका; CJP चा केंद्रावर हल्ला

माशी मारण्यासाठी हातोड्याचा वापर नको; सर्व काही ठप्प करता येणार नाही, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश

इंडिया आघाडीचे नेते भेटले राष्ट्रपतींना, मतचोरीचा मुर्मू यांनी इन्कार केला नाही - राहुल गांधी

'एसटी'च्या भूखंडांवर व्यावसायिक इमले; प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र निविदा बंधनकारक