मुंबईत वॉर्ड क्र. १५७ मधून शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सरिता म्हस्के, वॉर्ड क्र. ५९ मधून यशोधर फणसे, वॉर्ड क्र. ८८ मधून श्रवरी परब आणि प्रभाग २०० मधून उर्मिला पांचाळ विजयी
मुंबईतील २२७ पैकी १९७ जागांचे कल हाती आले असून महायुतीने १०० चा आकडा पार केला आहे. कलांनुसार, महायुती १०५ जागांवर, ठाकरे बंधू ६९ जागांवर आणि २३ जागांवर अन्य पक्ष आघाडीवर आहेत.
मुंबईत वॉर्ड क्रमांक १३५ मधून भाजपचे नवनाथ बन विजयी झाले आहेत. पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक लढवताना बन यांनी ठाकरे गटाच्या समीक्षा सक्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अक्षय पवार तर काँग्रेसच्या वसंत कुंभार यांचा त्यांनी पराभव केला.
पुण्यातील प्रभाग क्रमांक २५ मध्ये १ तास मतमोजणी बंद.
मुंबई महापालिकेच्या २२७ पैकी १५८ जागांवरचे कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप-शिवसेना(शिंदे) ८३ जागांवर आघाडीवर आहे. तर, शिवसेना (उबाठा) आणि मनसे ५९ जागांवर आघाडीवर आहे. १६ जागांवर अन्य पक्षाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.
मुंबईत वॉर्ड क्र. 194 मध्ये सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांचा पराभव झाला आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निशिकांत शिंदे यांनी त्यांचा पराभव केला.
मुंबईत वॉर्ड क्र. १२४ मधून शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सकीना शेख विजयी झाल्या आहेत. तसेच, वॉर्ड क्रमांक १०८ मधून रमाकांत रहाटे देखील विजयी झालेत.
मुंबईतील जोगेश्वरी वॉर्ड क्र. ७३ मधून शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार लोना रावत विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिंदे गटाचे खासदार रविंद्र वायकर यांच्या कन्या दीप्ती वायकर यांचा पराभव केला.
मुंबई महापालिकेतील ८५ जागांचे कल हाती आले असून २८ जागांवर ठाकरे बंधूंची शिवशक्ती तर ४५ जागांवर भाजप-शिवसेना महायुती आघाडीवर आहे. १२ जागांवर अन्य पक्षांनी आघाडी घेतली आहे.
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंच्या शिवशक्तीने पहिला विजय मिळवला आहे. वॉर्ड क्रमांक १८२ मधून शिवसेना (उबाठा) चे उमेदवार मिलिंद वैद्य यांनी भाजपचे राजन पारकर आणि अपक्ष महेश धनमेहेर यांचा पराभव केला.
मुंबईतील प्रभाग क्रमांक १६५ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांचा काँग्रेसचे आशरफ आझमी यांनी पराभव केला. आझमी यांना ७ हजार ७८२ मते, तर कप्तान मलिक यांना ४,८६३ मते मिळाली.
प्रभाग क्रमांक २ मधून भाजपच्या तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात पक्षांतर, अनुभवी नेत्यांची उमेदवारी आणि प्रमुख पक्षांमधील थेट संघर्ष यामुळे ही लढत विशेष लक्षवेधी ठरली होती. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आणि माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपत प्रवेश करून उमेदवारी स्वीकारली होती. त्यांच्या विरोधात शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या धनश्री कोलगे आणि काँग्रेसच्या मेनका सिंह यांच्यात तिरंगी सामना होता.
नवी मुंबईतील १११ पैकी सुरूवातीच्या ५५ जागांवरील कलांमध्ये भाजप-शिवसेनेने स्पष्टपणे आघाडी घेतली असून दोन्ही पक्ष २७ - २७ जागांवर आघाडीवर आहेत. तर, शिवसेना (उबाठा) केवळ एका जागेवर आघाडीवर आहे.
मुंबईतील पहिला निकाल आला असून काँग्रेसच्या आशा काळे विजयी झाल्या आहेत. धारावी, वॉर्ड क्रमांक १८३ मधून त्या १४५० मतांनी विजयी झाल्या, यासोबतच काँग्रेसने मुंबईत आपले खाते उघडले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप १५, शिवसेना (शिंदे) ९, राष्ट्रवादी (अजित पवार) २, शिवसेना (उबाठा) ६ आणि राष्ट्रवादी (शरद पवार) १ आणि काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर
नाशिक महापालिकेत १२२ पैकी २२ जागांचे कल; भाजप ८, एकनाथ शिंदेंची शिवसेना ५, राष्ट्रवादी (अजित पवार) २, शिवसेना (उबाठा) ३ आणि राष्ट्रवादी (शरद पवार) १ जागेवर आघाडीवर आहे.
मुंबईत भाजपला ९० जागा मिळतील आणि शिवसेनेला ४०; हा आकडा वाढू शकतो पण कमी होणार नाही. पुण्यात आम्हाला ११५ पेक्षा कमी जागा मिळणार नाहीत, असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
मीरा-भाईंदरमध्ये १० जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर, शिंदेंची शिवसेना ५ आणि शिवसेना (उबाठा) एका जागेवर आघाडीवर आहे.
ठाणे महापालिकेतील १३१ पैकी १५ जागांच्या ट्रेंड्समध्ये भाजप ६ आणि शिंदेंची शिवसेना ९ जागांवर आघाडीवर
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील २२ जागांचे कल हाती आले असून सर्व २२ जागांवर भाजप-शिवसेनेने आघाडी घेतली आहे. १५ जागांवर भाजप तर ७ जागांवर शिंदेंची शिवसेना आघाडीवर आहे. शिवसेना (उबाठा), मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीला येथे अद्याप खातेही खोलता आलेले नाही.
पुण्यातील १६५ पैकी ६४ जागांचे कल हाती आले असून भाजप सर्वाधिक ४२ जागांवर आघाडीवर आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) १६, शिवसेना ४ आणि शिवसेना (उबाठा) एका जागेवर पुढे आहे.
मुंबईतील २२७ पैकी ५६ जागांच्या ट्रेंड्समध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत. ५६ जागांच्या कलांमध्ये भाजप २४, शिवसेना (उबाठा) १५, एकनाथ शिंदेची शिवसेना ८ आणि मनसे ६ जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर आहे.
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या निकालांबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना नेत्या मनीषा कायंदे म्हणाल्या, "एक्झिट पोल्स नेहमी अचूक ठरतातच असे नाही. महायुती सरकारच्या गेल्या साडेतीन वर्षांच्या कामगिरीवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आम्ही भाषिक किंवा प्रादेशिक मुद्द्यांवर नाही, तर विकासाच्या आधारावर जनतेसमोर गेलो. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आचारसंहितेच्या काळात दुबार मतदानासारखे आरोप केले, अशा आरोपांमुळे मतदारांमध्ये केवळ संभ्रम निर्माण होतो." याचवेळी त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावरही निशाणा साधला. “किशोरी पेडणेकर जिंकल्या किंवा हरल्या तरी त्यांनी केलेल्या कृतींचे परिणाम त्यांना भोगावेच लागतील,” असेही मनीषा कायंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
मुंबई महानगरपालिकेच्या २२७ पैकी ४६ जागांचे कल समोर आले असून यानुसार भाजप आणि शिवसेना (उबाठा) सर्वाधिक १२ जागांवर तर एकनाथ शिंदेची शिवसेना ८ आणि मनसे ४ जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय काँग्रेस ५ आणि अपक्ष ५ जागांवर आघाडीवर आहेत.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालाबाबत, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि निवडणूक अधिकारी अभिजीत चौधरी म्हणाले, "मतमोजणीसाठी आम्ही १० वेगवेगळ्या झोननुसार १० ठिकाणी व्यवस्था केली आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर २० टेबल आहेत, जिथे ईव्हीएमची मतमोजणी होईल. याव्यतिरिक्त, प्रत्येक झोनमध्ये टपाल मतांच्या मोजणीसाठी प्रत्येकी ४ टेबल असतील... सर्व तयारी पूर्ण झाली असून, मतमोजणी प्रक्रिया सकाळी १० वाजता सुरू होईल. सर्व प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी सुरू होईल.
मुंबई : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार, टपाली मतपत्रिकेच्या पेट्या मतदान यंत्रासह (ईव्हीएम) मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ रोजी अभिरक्षा कक्षातून (स्ट्राँग रूम) बाहेर काढण्यात येतील. त्या अनुषंगाने, उमेदवार किंवा उमेदवाराने अधिकृतरित्या नेमलेले प्रतिनिधी यांनी नमूद केलेल्या वेळेत उपस्थित राहावे, असे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळवले आहे. टपाली मतपत्रिकांचे प्रभागनिहाय विलगीकरणदेखील त्याचवेळेला करण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक २०० ते २०६) यांनी टपाली मतपत्रिकांबाबत ८ जानेवारी २०२६ रोजी सर्व उमेदवारांना पाठविलेले पत्र अनावधानाने प्रसारित झाले होते. सदर पत्र तत्काळ मागे घेण्यात आले असून त्याऐवजी सुधारित पत्र निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार, गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता टपाली मतपत्रिकांच्या पेट्या स्ट्रांँग रूमबाहेर काढण्यात येणार नाहीत. याची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी नोंद घ्यावी, असे आयोगाने स्पष्ट केले.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुंबईत एकूण २२७ निवडणूक प्रभागांकरिता २३ ठिकाणी मतमोजणी केंद्रे तयार करण्यात आली असून त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (वाचा सविस्तर बातमी)
राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेवर गेली २५ वर्षे असलेली ठाकरेंची सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने आपले सर्वस्व पणाला लावले आहे. त्यामुळे देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईवर कुणाची सत्ता येणार याबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.