महाराष्ट्र

व्हॉट्सअ‍ॅपवर प्रफुल पटेलांचा 'डीपी' लावून फेक अकाउंटद्वारे पैसे मागितले; व्यावसायिकाला अटक

कतारमधील एका राजघराण्याकडूनही त्याने पैशांची मागणी केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांचे नाव आणि फोटो वापरून तयार केलेल्या बनावट व्हॉट्सअप खात्याच्या आधारे परदेशातील लोकांकडून पैसे मागितल्याप्रकरणी मुंबईतील एका व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली आहे. राहुल कांत असे या व्यक्तीचे नाव असून जुहू परिसरात तो वास्तव्यास आहे. कतारमधील धनाढ्य कुटुंबातील सदस्यांसह परदेशातील काही लोकांकडून त्याने पैशांची मागणी केल्याचे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. त्याला महाराष्ट्र सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राहुल कांत याने पेड अॅप्लिकेशनवरून प्रफुल पटेल यांचा मोबाईल नंबर मिळवला होता. पटेल यांचे नाव आणि फोटोचा डीपीसाठी वापर करून बनावट व्हॉट्सअॅप अकाऊंट तयार केले. त्यानंतर परदेशातील लोकांकडून पैशांची मागणी करायला सुरुवात केली. कतारमधील एका राजघराण्याकडून त्याने पैशांची मागणी केल्याचे पोलिसांनी सांगितले.

पटेल यांचे सहकारी विवेक अग्निहोत्री यांनी महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर २३ जुलै रोजी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. जुहू येथून पोलिसांनी राहुल कांत याला ताब्यात घेतले. तो आर्थिक अडचणीत होता आणि झटपट पैसे कमावण्यासाठी त्याने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन