महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! डंपरला भरधाव कारची धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

रत्नागिरीतील लांजाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव कारने डंपरला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील दोन महिला आणि एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Krantee V. Kale

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका भरधाव कारने लांजाजवळ पुढे जाणाऱ्या डंपरला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत कारचा अक्षरशः चुराडा झाला असून एकाच कुटुंबातील दोन महिला आणि एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. मुंबई आग्रीपाडा येथे राहणारे हे कुटुंब गोव्यातून मुंबईला परतत असताना हा अपघात घडला. या अपघातामध्ये अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे.प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कुटुंब गोव्यातील प्रवास आटोपून मुंबईच्या दिशेने निघाले होते. लांजा शहराजवळ आल्यानंतर पुढे जात असलेल्या डंपरला त्यांच्या भरधाव कारची मागून जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा पूर्ण चुराडा झाला आणि वाहनातील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

मृतांची ओळख अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नसून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण