महाराष्ट्र

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात; दोन जण ठार

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई मार्गिकेवर सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण अपघात घडला. तांदूळ भरलेला ट्रक, खाद्य तेल वाहून नेणारा कंटेनर आणि एर्टिगा कार यांचा समावेश असलेल्या या अपघातात ट्रक चालक व क्लिनर यांचा जागीच मृत्यू झाला असून इतर तिघेजण जखमी झाले आहेत.

Swapnil S

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई मार्गिकेवर सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण अपघात घडला. तांदूळ भरलेला ट्रक, खाद्य तेल वाहून नेणारा कंटेनर आणि एर्टिगा कार यांचा समावेश असलेल्या या अपघातात ट्रक चालक व क्लिनर यांचा जागीच मृत्यू झाला असून इतर तिघेजण जखमी झाले आहेत.

पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तांदूळ भरलेल्या ट्रकवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याची समोर असलेल्या कंटेनर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली. याचवेळी बाजूने जाणाऱ्या कारलाही धडक लागल्याने अपघाताची तीव्रता वाढली. धडकेनंतर तांदूळ भरलेला ट्रक आणि खाद्य तेल वाहून नेणारा कंटेनर रस्त्यावर पलटी झाला.

या अपघातात ट्रकचालक व क्लिनर यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. कंटेनरचालक किरकोळ जखमी झाला आहे. जखमींमध्ये लीलाबाई सस्ते, मुकिंदा सस्ते आणि महेंद्र पाल यांचा समावेश आहे.

अपघातामुळे तांदळाच्या बॅगा आणि खाद्य तेल रस्त्यावर विखुरल्याने काही काळ द्रुतगती मार्गावरील चारही लेन प्रभावित झाल्या होत्या. जखमींना उपचारासाठी खोपोली ग्रामीण रुग्णालय तसेच एमजीएम रुग्णालय, कामोठे येथे हलविण्यात आले. अपघातग्रस्त वाहने आणि रस्त्यावर पडलेला माल हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

हुंड्यासाठी पत्नीचा छळ; थार अन् बाईक न दिल्याने केस धरून रस्त्यावर फरफटवलं, लाथाही मारल्या, पतीचं कृत्य CCTV मध्ये कैद

चेंबूर, दादरवरून थेट दक्षिण मुंबईत; सायन सर्कलजवळील पुलाला दोन अतिरिक्त मार्गिका, १३० कोटींचा प्रकल्प; डिसेंबर २०२७ पर्यंत काम पूर्ण होणार

मुंबईतील ४८ 'ब्लॅक स्पॉट' होणार सुरक्षित; अपघात रोखण्यासाठी दुभाजक, फलक लावणार

मुंबईतील ७ उपाहारगृहांचे परवाने निलंबित; ५६४ लिटर दूध नष्ट

कराड : मुलाच्या खूनप्रकरणी घरातील तिघांना अटक