मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेस उद्यापासून रोज धावणार प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेस उद्यापासून रोज धावणार

कोकणावासीयांच्या सेवेसाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) - सावंतवाडी रोड-सीएसएमटी एक्स्प्रेस सुरू केली आहे. ही गाडी गुरुवार, १० सप्टेंबरपासून नियमितपणे धावणार आहे.

Swapnil S

मुंबई : कोकणावासीयांच्या सेवेसाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) - सावंतवाडी रोड-सीएसएमटी एक्स्प्रेस सुरू केली आहे. ही गाडी गुरुवार, १० सप्टेंबरपासून नियमितपणे धावणार आहे. त्यामुळे मुंबई ते कोकण दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

या रेल्वेगाडीच्या आरक्षणाला ८ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. प्रवासी संगणकीकृत आरक्षण केंद्रे तसेच आयआरसीटीसीच्या माध्यमातून तिकीट आरक्षित करू शकतील. १० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या प्रवासाच्या सर्व फेऱ्यांसाठीचे आरक्षण ९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली, इंटरनेट आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होईल.

गाडी दरदरोज धावेल

गाडी क्रमांक १५०८७ ‘सीएसएमटी–सावंतवाडी रोड एक्सप्रेस’ दररोज सीएसएमटी येथून रात्री ११.५५ वाजता सुटेल. पावसाळी वेळापत्रकानुसार ही गाडी २० ऑक्टोबरपर्यंत दुसऱ्या दिवशी दुपारी १.५० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. २१ ऑक्टोबरपासूनच्या वेळापत्रकानुसार ती दुपारी २.१५ वाजता पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक १५०८८ सावंतवाडी रोड – सीएसएमटी एक्सप्रेस दररोज धावेल. ही गाडी २० ऑक्टोबरपर्यंत सायंकाळी ५ वाजता, तर २१ ऑक्टोबरपासून ५.२० वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४० वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.

या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

नांदेड–सावंतवाडी रोडदरम्यान चार गणपती विशेष गाड्या

मध्य रेल्वेने हजूर साहिब नांदेड–सावंतवाडी रोड मार्गावर आणखी चार गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. १२ ते १७ सप्टेंबरदरम्यान या गाड्या धावतील. गाडी क्रमांक ०७६५९ नांदेड–सावंतवाडी रोड १२ आणि १५ सप्टेंबर रोजी रात्री ८    वाजता हजूर साहिब नांदेड येथून सुटून तिसऱ्या दिवशी रात्री ३.३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०७६६० सावंतवाडी रोड–नांदेड १४ आणि १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता सावंतवाडी रोड येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३० वाजता हजूर साहिब नांदेड येथे पोहोचेल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

विरोधक म्हणजे 'नाराज फुफा'; प्रगती झाली तरी तक्रारी चालूच, मोदींचा हल्लाबोल; डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरचे उद्घाटन

Maratha Reservation : सरकारकडून निव्वळ फसवणूक - मनोज जरांगे; उपोषणाचा ११ वा दिवस, सलाईन घेतले

Maratha Reservation : चर्चेची दारे बंद- राधाकृष्ण विखे-पाटील यांचे संकेत

PM Modi's Mumbai Event: कार्यक्रमस्थळी बनावट PMO अधिकारी; बॉडीगार्ड आणि बंदुकीसह ताब्यात, सुरक्षेतील मोठी त्रुटी उघड

मोहम्मद अली रोड अतिक्रमणमुक्त; फुटपाथवरील बेकायदा स्टॉल्स, दुकाने, बांधकामांवर हातोडा; BMC च्या 'बी' वॉर्डात धडक कारवाई