महाराष्ट्र

महाराष्ट्रातील 'या' भाजप खासदाराचा कुस्तीपटूंना पाठिंबा

कुस्तीपटूंशी संवाद साधायला सरकारकडून कोणीच गेलं नसल्याची खंत मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

नवशक्ती Web Desk

भारताला जागतिक स्तरावर पदकं मिळवून देणाऱ्या कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघातील अन्यायाला आणि शोषणाला वाचा फोडण्यासाठी आंदोलन सुरु केलं आहे. अत्यंत अमानुषपणे दिल्ली पोलिसांनी हे आंदोन मोडून काढलं. यावेळी खेळाडूंना फरफटत नेल्याचे फोटो सर्वत्र व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. याप्रकरणाची सरकारकडून कोणतीही दखल अद्याप घेतली जात नाही. सरकारने अधिकृतपणे यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता या प्रकरणावर महाराष्ट्रातील भाजप खासदाराने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कुस्तीपटूंच्या सुरु असलेल्या आंदोलनावरुन भाजप खासदर प्रीतम मुंडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. कुस्तीपटूंशी संवाद साधायला सरकारकडून कोणीच गेलं नसल्याची खंत मुंडे यांनी व्यक्त केली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत भारताच्या आघाडीच्या कुस्तीपटूंनी आंदोलन छेडलं आहे. खासदार प्रीतम मुंडे यांनी या प्रकरणावर अगदी रोख ठोक पद्धतीनं आपलं मत मांडलं आहे. त्यांनी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना समर्थन दिलं आहे. खेळाडूंच्या तक्रारींची दखल घेतली जात नसेल तर ते लोकशाहीत स्वागतार्ह नसल्याचं मुंडे म्हणाल्या आहेत. कुस्तीपटूंच्या बाजू घेणाऱ्या प्रीतम मुंडे या पहिल्या भाजप नेत्या आहेत. आतापर्यंत कोणताच भाजप नेता, खासदार, आमदाराने यावर प्रतिक्रिया दिली नाही किंवा खेळाडूंना पाठिंबा दर्शवलेला नाही.

यावेळी बोलताना मुंडे म्हणाल्या की, एक खासदारच नाही तर महिला म्हणूनही मला त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था अल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच अशा प्रकारचे आरोप झाल्यावर त्यांची वेळेवर चौकशी व्हायला होती. त्यातील सत्य समोर यायला हवं होतं. सरकारकडून कोणीच त्या महिला खेळाडूंशी संवाद साधायला गेलं नाही. या प्रकरणात योग्य ती कारवाई व्हायला हवी, असं देखील मुंडे म्हणाल्या आहेत. बीड येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

विघ्नहर्त्याचे राज्यात आगमन; सर्वत्र उत्साहाचे वातावरण

भारत-पाकिस्तानने एकमेकांची ७ विमाने पाडली; ट्रम्प यांचा नवा दावा, दोन्ही देशांमधील अणुयुद्ध थांबविल्याचाही पुनरुच्चार

सशस्त्र दलांनी दीर्घ संघर्षासाठी तयार राहावे; संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान

मुंबईत एसी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सप्टेंबरपासून; गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए प्रवास होणार जलद

जरांगे मुंबईकडे रवाना; मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई