PTI
महाराष्ट्र

Nagpur Audi hit-and-run: नागपूर ऑडी प्रकरण, सीसीटीव्ही फुटेज गायब

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत आणि त्याच्या मित्रांनी ज्या हॉटेलात जेवण व मद्यसेवन केले, त्या हॉटेलच्या कॅमेऱ्यातील सीसीटीव्ही चित्रीकरण गायब असल्याचे उघडकीस आले आहे.

Swapnil S

नागपूर: भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत आणि त्याच्या मित्रांनी ज्या हॉटेलात जेवण व मद्यसेवन केले, त्या हॉटेलच्या कॅमेऱ्यातील सीसीटीव्ही चित्रीकरण गायब असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी हा कॅमेरा ताब्यात घेतला असून तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

येथील ‘ला होरी’ बारमध्ये संकेत व त्याचे मित्र ऑडी कार दुर्घटनेच्या काही वेळ आधी आले होते. हॉटेलचा मालक सीसीटीव्ही फुटेज देण्यास टाळाटाळ करीत होता. मात्र कारवाई करण्याचा इशारा देताच त्याने हॉटेलचा कॅमेरा पोलिसांकडे सुपूर्द केला. मात्र, कॅमेऱ्यात रविवार रात्रीपासूनचे चित्रीकरण गायब करण्यात आल्याचे पोलिसांना आढळून आले.

भ्रष्टाचार, गैरकारभार, वाढत्या गुन्हेगारीने महाराष्ट्राचे अध:पतन

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीचे परिणाम

आजचे राशिभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

डॉक्टर आत्महत्या प्रकरण : रणजीतसिंह निंबाळकरांवर विरोधकांचा आरोप; मात्र, मुख्यमंत्री फडणवीसांचा पाठिंबा, म्हणाले, "चिंता करू नका...

पाकिस्तानात सलमान खान 'दहशतवादी' घोषित; एका विधानाने 'भाईजान' ठरला अतिरेकी