Nagapur : जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरीन गळती; ५६ जण रुग्णालयात दाखल, ८ जण अतिदक्षता विभागात  X | Video - ANI
महाराष्ट्र

Nagapur : जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरीन गळती; ५६ जण रुग्णालयात दाखल, ८ जण अतिदक्षता विभागात

नागपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रात सोमवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या क्लोरीन वायू गळतीमुळे ५६ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Swapnil S

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रात सोमवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या क्लोरीन वायू गळतीमुळे ५६ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. उपचारानंतर ११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, ४५ जणांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी ८ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले आहे.

नागपूर महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गोधणी ग्रामपंचायत हद्दीतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रात रात्री १ वाजेच्या सुमारास ९०० किलो क्षमतेच्या क्लोरीन वायूच्या सिलेंडरमधून गळती सुरू झाली. वायू गळतीमुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास झाला; लोकांची पळापळ झाली असून अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

२४ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास गोधणी जलशुद्धीकरण केंद्रातील दोन क्लोरीन सिलेंडरपैकी एका सिलेंडरमधून गळती होत असल्याचे लक्षात आले. या दुर्घटनेचे संभाव्य धोके टाळण्यासाठी नागपूर जिल्हाधिकारी, आरोग्य सेवा संचालनालय, औद्योगिक सुरक्षा प्राधिकरणाचे अधिकारी आणि एनडीआरएफच्या पथकाने समन्वयाने काम केले, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिली. गळती होणारा सिलेंडर पूर्णपणे पाण्यात बुडवून हा धोका नियंत्रणात आणण्यात आला. बाधित भागात रुग्णालय प्रशासन आणि राज्य आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तात्काळ सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क केले आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी रवाना केले. एनडीआरएफच्या पथकाने तातडीने बचाव कार्य सुरू केले आणि तांत्रिक उपाययोजना करून मोठा धोका टळला. एनडीआरएफ, वैद्यकीय पथके आणि जिल्हाधिकारी यांच्यातील समन्वयामुळे बाधित नागरिकांना त्वरित वैद्यकीय उपचार मिळाले, ज्यामुळे मोठा दिलासा मिळाला.

नागरिकांना खोकला, श्वासोच्छवासास त्रास

या वायू गळतीमुळे शेजारील निवासी भागात घबराट पसरली असून अनेक लोकांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास झाला, असे मनपाने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी २०० मीटरच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आणि तो भाग सील केला. जवळपासच्या वस्त्यांमधील नागरिकांना दूर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, बाधितांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे मनपाने सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

गणरायाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न! ऑगस्ट महिन्यात साडेतीन हजारांहून अधिक तक्रारी; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे मंडळांची चिंता वाढली

सुटे तेलविक्री बंदीविरोधात व्यापारी आक्रमक; सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम, राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

सट्टेबाजीमुळेच कांद्याची दरवाढ - केंद्राचा दावा; किरकोळ दरात ५९ टक्क्यांची वाढ, सरकारचा 'कांदा एक्स्प्रेस'चा धडाका

दिवाळीपर्यंत साखरेची ‘शंभरी’? ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना दरवाढीचा फटका

डिजिटल अरेस्ट : मुंबईत ED कडून दोघांना अटक