नागपूर 'हिट अँड रन' केस 
महाराष्ट्र

नागपूर 'हिट अँड रन' केसमध्ये धक्कादायक खुलासा, सुनेनंच दिली सासऱ्याच्या हत्येची सुपारी

Nagpur Hit and Run Case : अर्चना पुट्टेवार हिनं नवऱ्याच्या ड्रायव्हरला सासऱ्याच्या हत्येसाठी दिली १ कोटी रुपयांची सुपारी

Suraj Sakunde

नागपूर: नागपूरच्या 'हिट अँड रन' प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. संपत्तीच्या हव्यासापोटी सुनेनंच सासऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे. नागपूर क्राईम ब्रांचच्या युनिट चारनं या प्रकरणाचा छडा लावला असून आरोपी सुनेसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

भरधाव कारनं ज्येष्ठ नागरिकाला चिरडलं-

नागपूरच्या बालाजी नगर परिसरात एका भरधाव कारने चिरडल्यामुळं पुरुषोत्तम पुट्टेवार (वय ८२) या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता. 22 मे रोजी घडलेल्या या अपघाताचं सीसीटीव्ही फूटेजदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. मात्र हा अपघात नसून सुनियोजित कट असल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या करण्यासाठी सून अर्चना पुट्टेवार हिनं नवऱ्याचा ड्रायव्हर सार्थक बागडेला तब्बल एक कोटी रुपयांची सुपारी दिल्याचं निष्पन्न झालं आहे.

नवऱ्याच्या ड्रायव्हरला दिली १ कोटींची सुपारी-

300 कोटी रुपयांच्या संपत्तीच्या हव्यासापोटी सून अर्चना पुट्टेवार हिनं पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्येची सुपारी सार्थक बागडेला दिली होती. यासोबतच बारचे लायसन्स आणि बारसाठी जागा देण्याचं आमिषही तिनं बागडेला दाखवलं होतं. तिनं त्याला 17 लाख रुपये ॲडव्हान्सही दिला होता. आरोपी सून अर्चना ही गडचिरोली जिल्ह्यात सरकारी नोकरीत कार्यरत आहे. तर पोलिसांनी आता या प्रकरणात सुनेसह तीन आरोपींना अटक केल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंघल यांनी माध्यमांना दिली.

संजय राऊत यांना गंभीर आजार; बाहेर जाण्यास, गर्दीत मिसळण्यास निर्बंध, पोस्ट करीत म्हणाले - 'नवीन वर्षात भेटू'

New Rules From November 1: उद्यापासून बँकिंग, GST, आधार आणि पेन्शनमध्ये मोठे बदल; तुमच्यावर कसा होणार परिणाम? जाणून घ्या

Powai Hostage Case : 'तो आधी फ्रेंडली होता, नंतर...'; ओलिस ठेवलेल्या मुलीने सांगितला घटनेचा थरार

Powai Hostage Case : माजी मंत्री दीपक केसरकरांचा जुना व्हिडिओ व्हायरल; रोहित आर्यच्या प्रकल्पाचं केलं होतं कौतुक

कल्याणमध्ये ३० वर्षांपासून राहणाऱ्या नेपाळी महिलेचा पर्दाफाश; भारतीय कागदपत्रांसह मुंबई विमानतळावर घेतले ताब्यात