नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील सामाजिक क्रांतीची सुरुवात ही नागपुरातून झाली. त्यामुळे नागपूरचे नाव ‘दीक्षाभूमी’ करणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केले. तसेच उद्धव ठाकरे यांनीही यासंदर्भात सूचना केल्याचा दावा राऊत यांनी केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारने नागपूरच्या नामांतराचा प्रस्ताव तयार केल्यास त्या निर्णयाला आमचा पक्ष पाठिंबा देईल, असेही खा. राऊत यांनी स्पष्ट केले. एकीकडे दादरच्या नामांतराची मागणी जोर धरत असताना आणि त्यावरून वाद निर्माण झाला असताना या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी ही नवी मागणी करत सरकारला एकप्रकारे कोंडित पकडले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारने नागपूरच्या नामांतराचा प्रस्ताव तयार केल्यास त्या निर्णयाला त्यांचा पक्ष पाठिंबा देईल, उद्धव ठाकरे यांनीही यासंदर्भात सूचना केल्याचा दावा राऊत यांनी केला. यावर शुक्रवारी नागपुरात प्रसारमाध्यमासोबत बोलताना महसूलमंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नागपूरची दीक्षाभूमी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. नागपुरात येणारा प्रत्येक व्यक्ती दीक्षाभूमीला भेट देतो. दीक्षाभूमीच्या नावानेच नागपूरची जगभरात ओळख निर्माण झाली आहे. दीक्षाभूमीचे महत्त्व संपूर्ण जगाला माहीत आहे, असेही बावनकुळे म्हणाले.