डॉ. नीलम गोऱ्हे संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

नागपूर : 'त्या' डॉक्टरवर कठोर कारवाई करा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश!

नागपूर शहर हद्दीमध्ये हुडकेश्वर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील समुपदेशक डॉक्टरने मागील नऊ-दहा वर्ष करिअर कौन्सिलिंग व इतर समुपदेशनाच्या नावाखाली अकरावी-बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Swapnil S

नागपूर : नागपूर शहर हद्दीमध्ये हुडकेश्वर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील समुपदेशक डॉक्टरने मागील नऊ-दहा वर्ष करिअर कौन्सिलिंग व इतर समुपदेशनाच्या नावाखाली अकरावी-बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ४ जानेवारी २०२५ रोजी एका महिलेने तक्रार दाखल केल्याने सदर घटना उघडकीस आली असून अकरावी, बारावीच्या त्यावेळी अज्ञान असलेल्या मुलींच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर अत्याचार व ब्लॅकमेलिंग केल्याचे समजते. याप्रकरणाची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश नागपूर शहर पोलीस आयुक्त यांना दिले आहेत.

पोलिसांनी या एका तक्रारीच्या आधारे अजून तीन फिर्यादीं चा शोध घेऊन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. स्वयंप्रेरणेने केलेली ही कार्यवाही दखलपात्र व मानवी अधिकाराबाबत सजगता दाखवून देणारी आहे, असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या. त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागपूर पोलीस आयुक्तांना काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

संबंधित प्रकरणातील सर्व आरोपी यांना कठोर शिक्षा होण्याच्या अनुषंगाने सदर प्रकरणाची सखोल चौकशी तात्काळ करण्यात यावी. मागील नऊ-दहा वर्षापासून आरोपीकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत असल्याने याबाबत सबळ पुरावे संकलित करण्यात यावेत व सत्वर चार्जशीट दाखल करण्याची दक्षता घ्यावी.

साक्षीदार सुरक्षा कायद्यांतर्गत संबंधित पीडित महिला साक्षीदार यांना योग्य संरक्षण पुरवण्याची कार्यवाही करावी. त्यांच्या नावांबाबत गोपनीयता राखण्यात यावी. हे प्रकरण जलद गती न्यायालयासमोर चालवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. त्याचबरोबर आरोपीस कठोर शिक्षा होण्याच्या अनुषंगाने अनुभवी व निष्णात  सरकारी वकील नियुक्त करण्यात यावेत. समुपदेशनातून देखील अत्याचार होत असल्याने आता महिला समुपदेशक नियुक्त करून त्यांच्यामार्फतच संबंधित महिलांना योग्य समुपदेशन मिळावे, यासाठीची तरतूद करावी.

शासकीय पंचांची नियुक्ती करावी

नियमितपणे समुपदेशन घेणाऱ्या व्यक्तींकडून निरपेक्ष व स्वतंत्र यंत्रणांकडून समुपदेशन प्रक्रियांचे मूल्यमापन करण्यात यावे. मुलींचे स्वमदत गट करून मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम विश्वासार्ह महिला संस्थांतर्फे करून घेण्यात यावे. त्याचबरोबर याप्रकरणी शासकीय पंचांची नियुक्ती करून तपासामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आयुक्तांना निर्देश दिले आहेत.

शिमग्याला गावी जाणाऱ्या कोकणकरांसाठी गुड न्यूज! मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी १ मार्चपासून; पाहा वेळापत्रक आणि तिकीट दर

नागपुरात १२ वीचा केमिस्ट्री पेपर लीक! विद्यार्थिनीच्या वारंवार वॉशरूमला जाण्यामुळे आली शंका; मोबाईलमध्ये सापडला पुरावा

आता शिळफाटा रस्त्यावर मेट्रोने प्रवास; मेट्रो १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा; MMRDA च्या अर्थसंकल्पात समावेश

Mumbai : मोनोरेल पुन्हा धावणार! सीसीटीव्ही, चार्जिंग पॉइंट्स, स्मार्ट सिग्नलिंग अशा २१ नव्या सुविधांसह सज्ज; MMRDA ची घोषणा

महामार्गावर टोलवसुली होणार कॅशलेस; १ एप्रिलपासून अंमलबजावणीचे संकेत