गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व उलगडणार; प्रतापगड-शिवनेरी किल्ल्यांवर नमो पर्यटन माहिती केंद्र संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व उलगडणार; प्रतापगड-शिवनेरी किल्ल्यांवर नमो पर्यटन माहिती केंद्र

गडकिल्ल्यांचा इतिहास राज्यातील विशेष करून तरुण पिढी उलगडावा यासाठी गडकिल्ल्यांवर नमो पर्यटन माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व, किल्ल्यांवर झालेल्या लढाया, किल्ल्यांचा पराक्रम याचा उलगडा होणार आहे.

Swapnil S

मुंबई : गडकिल्ल्यांचा इतिहास राज्यातील विशेष करून तरुण पिढी उलगडावा यासाठी गडकिल्ल्यांवर नमो पर्यटन माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व, किल्ल्यांवर झालेल्या लढाया, किल्ल्यांचा पराक्रम याचा उलगडा होणार आहे.

गडकिल्ल्यांचे संवर्धन व संरक्षण करण्यासह पर्यटनाला चालना मिळावी यासाठी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नमो पर्यटन माहिती केंद्र उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे पर्यटन विभागाचे संचालक बी. एन. पाटील यांनी सांगितले.

असल्याचे बी. एन. पाटील म्हणाले. प्रतापगड, रायगड, शिवनेरी आणि साल्हेर या किल्ल्यांवर नमो पर्यटन माहिती केंद्र उभारण्यात येणार असून प्रतापगड, शिवनेरी किल्ल्यावर केंद्र उभारणीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात

राज्यातील पर्यटनक्षेत्राला नवी गती देण्यासाठी राज्य सरकारकडून मोठी पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पर्यटन विभागाच्या वतीने प्रतापगड, रायगड, शिवनेरी आणि साल्हेर या चार ऐतिहासिक किल्ल्यांच्या परिसरात 'नमो पर्यटन माहिती सुविधा केंद्रे' उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने प्रतापगड आणि शिवनेरी किल्ल्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरु केली असून, उर्वरित रायगड व साल्हेर किल्ल्यांसाठी पुढील दोन दिवसांत निविदा काढण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी राज्यभर ७५ 'नमो पर्यटन माहिती सुविधा केंद्रे' उभारण्याची घोषणा केली आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात या चार किल्ल्यांभोवती केंद्रे उभारण्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला असून, त्यामुळे गडकोट पर्यटनाला नवसंजीवनी मिळणार आहे.

पर्यटकांना ऐतिहासिक स्थळांपर्यंत आरामदायी पद्धतीने पोहोचण्यासाठी मार्गदर्शन, सुविधा आणि माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नमो पर्यटन केंद्र उभारण्यास कडक विरोध दर्शवला आहे, "किल्ल्यावर किंवा परिसरात असे केंद्र उभारले तर फोडून टाकू," असा इशारा दिला आहे. विरोधकांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का दिले नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. दरम्यान, सरकारने 'नमो' नावाबाबतची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता याबाबत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

राज्यात १ मेपासून परवानाधारक रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्यांचे परवाने रद्द करणार - सरनाईक

३६ तासांच्या 'बंद'नंतरही ठाण्यात कमी दाबानेच पाणी; ऐन उन्हाळ्यात पाणीबंदीने नागरिक हैराण

रुग्णालयच आता होणार अर्जदार! अर्जमंजुरीची प्रक्रिया ८ तासांत; सीएम सहाय्यता निधीची नवीन प्रणाली

'व्हायरल'च्या नादात मर्यादा ओलांडल्या! भररस्त्यात तरुणीशी गैरवर्तन; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची धडाकेबाज कारवाई

रांजणगाव महागणपती मंदिर डागडुजीसाठी तीन महिने बंद