नांदेड महानगरची धुरा निलंगेकरांवर; भाजपचे ७४ जिल्हा प्रभारी जाहीर 
महाराष्ट्र

नांदेड महानगरची धुरा निलंगेकरांवर; भाजपचे ७४ जिल्हा प्रभारी जाहीर

आगामी राजकीय व संघटनात्मक कार्यक्रमांची प्रभावी करण्यासाठी अंमलबजावणी भारतीय जनता पक्षने राज्यभरात ७४ जिल्हा प्रभारींची नियुक्ती जाहीर केली आहे.

Swapnil S

नांदेड : आगामी राजकीय व संघटनात्मक कार्यक्रमांची प्रभावी करण्यासाठी अंमलबजावणी भारतीय जनता पक्षने राज्यभरात ७४ जिल्हा प्रभारींची नियुक्ती जाहीर केली आहे. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे संघटनाला नवी गती मिळणार असल्याचे मानले जात आहे. पक्ष या नियुक्त्यांमध्ये नांदेड जिल्ह्याचाही समावेश असून, महानगर प्रभारीपदी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेड उत्तरची जबाबदारी किरण पाटील यांच्याकडे, तर नांदेड दक्षिणची धुरा रेखा कुलकर्णी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे नांदेडमधील भाजप संघटन अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता या नियुक्त्या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत. परभणी शहरासाठी प्रवीण घुगे तर ग्रामीण भागासाठी आ. संजय केनेकर यांची नियुक्ती झाली आहे. हिंगोलीची जबाबदारी संजय कौडगे यांच्याकडे देण्यात आली आहे. जालना महानगरासाठी खासदार अजित गोपछडे तर ग्रामीण भागासाठी खासदार रामराव वडकुते यांची निवड करण्यात आली आहे. लातूर शहरासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड तर ग्रामीण भागासाठी मनोज पांगारकर यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

धाराशिव जिल्ह्यासाठी अर्चना पाटील चाकूरकर यांची नियुक्ती करण्यात आली असून, बीडसाठी सुनील राणे यांची निवड झाली आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरासाठी चैतन्यबापू देशमुख, उत्तर भागासाठी राहुल लोणीकर आणि पश्चिम भागासाठी माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Thane : सर्व्हिस सेंटरमध्ये १० जूनपर्यंत वाहने धुण्यावर निर्बंध; पाणीटंचाई टाळण्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

विश्रांती कक्षाचा वापर धार्मिक विधींसाठी पुण्यातील बहुराष्ट्रीय कंपनीची चौकशी करण्याचे निर्देश

अयान अहमद आईचे दागिने विकून करायचा शौक; अमरावती लैंगिक शोषणप्रकरणी धक्कादायक खुलासा

तमिळनाडूमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या; ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य EVMमध्ये बंद होणार, ४ मे रोजी निवडणुकीचा निकाल

जाॅन टर्नसच्या हाती ॲपल! टीम कूक लवकरच सोडणार कंपनीचे मुख्याधिकारीपद