महाराष्ट्र

नांदेड : मुलीला इशारा केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

नांदेड जिल्ह्यातील तामसा (ता. हदगाव) येथे एका ५५ वर्षीय व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला वाईट नजरेने पाहून अश्लील इशारे केल्याप्रककरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Swapnil S

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील तामसा (ता. हदगाव) येथे एका ५५ वर्षीय व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला वाईट नजरेने पाहून अश्लील इशारे केल्याप्रककरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना सोमवारी घडली असून, तामसा पोलिसांनी विलंब न करता मंगळवारी संशयीत आरोपीला बेड्या ठोकल्या.

सोमवारी पीडित मुलीची आई मोलमजुरीसाठी शेतावर गेली असता घरात आई नसल्याचे पाहून कांतराव शेकदारने दुपारच्या सुमारास मुलीच्या घराभोवती तीन-चार येरझारा मारत मुलीकडे वाईट नजरेने पाहत इशारे करत होता. हा प्रकार मुलीच्या पंधरा वर्षीय भावाच्या लक्षात आल्याने त्याने कांतरावास विचारणा केली असता, शेकदारने त्याला शिवीगाळ केली. हा प्रकार त्याने आपल्या आईला सांगितल्यानंतर आईने आपल्या नातेवाईकांना घेऊन तामसा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

तरुणांसाठी देशनिहाय स्किल पासपोर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Mumbai : पाणीचोरीला बसणार आळा! टँकरच्या प्रत्येक थेंबावर BMC ची डिजिटल नजर

साखर उत्पादनात २० टक्के घट; 'विस्मा'चा अंदाज

BMC रुग्णालयांना सुरक्षा कवच; बसविणार आग प्रतिबंधक प्रणाली; खर्च २ कोटी ३६ लाख रुपये; प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात

Mumbai : पंचतारांकित हॉटेलात जेवणाच्या टेबलावर झुरळ; डॉक्टरांनी केला व्हिडिओ शेअर; FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचे वेधले लक्ष