महाराष्ट्र

नांदेड-मुंबई प्रवास आता साडेनऊ तासांत

नांदेड मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा नांदेड रेल्वे स्थानकावरून आज शुभारंभकरण्यात आला. या एक्स्प्रेसमुळे नांदेड-मुंबई प्रवास आता ९ तास ३० मिनिटात पूर्ण होणार आहे. मराठवाड्यातील नांदेडला मुंबईशी जोडणारी ही पहिली वंदे भारत एक्स्प्रेस ठरली आहे.

Swapnil S

मुंबई : नांदेड मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा नांदेड रेल्वे स्थानकावरून आज शुभारंभकरण्यात आला. या एक्स्प्रेसमुळे नांदेड-मुंबई प्रवास आता ९ तास ३० मिनिटात पूर्ण होणार आहे. मराठवाड्यातील नांदेडला मुंबईशी जोडणारी ही पहिली वंदे भारत एक्स्प्रेस ठरली आहे.

या वंदे भारत एक्स्प्रेसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातून ऑनलाइन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून शुभारंभकेला.

मंत्रालयात आयोजित कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्म वीर मीना व इतर उच्च अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वंदे भारत एक्स्प्रेसमुळे नांदेड आणि राजधानी मुंबईच्या अधिक जवळ आले असून यामुळे निश्चितच मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार उघडले आहे.

प्रगत देशांसारखी आरामदायक सुविधा असलेली भारतात निर्मित वंदे भारत रेल्वे ही त्याचेच प्रतीक आहे. मुंबई ते नांदेड हे ६१० किलोमीटरचे अंतर ९.३० तासात पूर्ण होईल. पूर्वी जालनापर्यंत धावणारी वंदे भारत आता हुजूर साहिब नांदेडपर्यंत जाईल.

डब्यांची संख्या २०

रेल्वे गाडीची क्षमता ५०० वरून १,४४० पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच गाडीचे डब्बे ८ वरून २० पर्यंत वाढवण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

प्रतीक्षा संपली, बाप्पा आज घरोघरी! चैतन्यमूर्तीच्या आगमनासाठी मुंबईसह राज्यात उत्साहाला उधाण

भारतावर 'टॅरिफ' विघ्न! अमेरिकेकडून अतिरिक्त २५ टक्के 'टॅरिफ' लागू; भारताच्या ४८ अब्ज डॉलरच्या निर्यातीला फटका

हायकोर्टाच्या मनाईनंतरही जरांगे आंदोलनावर ठाम

मुंबईच्या लढाईत ठाकरे-शिंदे सेना आमनेसामने; गणेश मंडळांसाठी शिवसेनेची रणनीती

आता दररोज १३ तास काम! वाढीव तास काम करण्यास मुभा; महिलांना रात्रीच्या शिफ्टसाठी परवानगी