(संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

नांदेड - पुणे, नागपूर-नांदेड विमानसेवा तात्पुरती बंद

नांदेड - पुणे व नागपूर-नांदेड या मार्गावरील विमानसेवा मागील तीन दिवसांपासून काही तांत्रिक अडचणीमुळे बंद करण्यात आली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ही सेवा बंद राहणार असून, त्यानंतर पुन्हा पूर्ववत होणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Swapnil S

नांदेड : नांदेड - पुणे व नागपूर-नांदेड या मार्गावरील विमानसेवा मागील तीन दिवसांपासून काही तांत्रिक अडचणीमुळे बंद करण्यात आली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ही सेवा बंद राहणार असून, त्यानंतर पुन्हा पूर्ववत होणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नांदेडकरांसह देश-विदेशातील शीख भाविकांना दर्शनासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच मुंबई, पुणे, हैदराबाद जाण्यासाठीही सर्वांनाच मोठा त्रास होत होता. दरम्यान, जेमतेम अडीच महिने सुरळीत चालल्यानंतर आणि प्रवाशांच्या प्रतिसादानंतरही नागपूर-नांदेड व नांदेड-पुणे या मार्गावरील विमानसेवा मागील दोन दिवसांपासून बंद करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणीमुळे ३० सप्टेंबरपर्यंत ही सेवा बंद करण्यात आली असून, पुन्हा पूर्ववत करण्यात येईल, असे विमानतळ प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

आठवड्यातून चार दिवस विमानसेवा

मागील तीन वर्षांपूर्वी बंद पडलेली येथील विमानसेवा एप्रिल २०२४ पासून पुन्हा एकदा सुरू झाली आहे. पहिल्या टप्यात दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद, हैद्राबाद या ठिकाणी विमानसेवा सुरू करण्यात आली होती. परंतु, पुणे व मुंबईसाठी प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर २७ जूनपासून नांदेड-पुणे व नांदेड-नागपूर विमानसेवेला सुरुवात झाली. विशेष म्हणजे मराठवाड्यात नांदेडहून नागपूरकडे जाणारी पहिली स्टार एअरची विमानसेवा या ठिकाणी कार्यरत होती. आठवड्यातून सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार असे चार दिवस नांदेड-पुणे, नांदेड-नागपूर ही विमानसेवा सुरू करण्यात आली होती.

प्रतीक्षा संपली, बाप्पा आज घरोघरी! चैतन्यमूर्तीच्या आगमनासाठी मुंबईसह राज्यात उत्साहाला उधाण

भारतावर 'टॅरिफ' विघ्न! अमेरिकेकडून अतिरिक्त २५ टक्के 'टॅरिफ' लागू; भारताच्या ४८ अब्ज डॉलरच्या निर्यातीला फटका

हायकोर्टाच्या मनाईनंतरही जरांगे आंदोलनावर ठाम

मुंबईच्या लढाईत ठाकरे-शिंदे सेना आमनेसामने; गणेश मंडळांसाठी शिवसेनेची रणनीती

आता दररोज १३ तास काम! वाढीव तास काम करण्यास मुभा; महिलांना रात्रीच्या शिफ्टसाठी परवानगी