लाचप्रकरणी महिला मंडळ अधिकारी जेरबंद; ACB ने ५० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

Nashik : लाचप्रकरणी महिला मंडळ अधिकारी जेरबंद; ACB ने ५० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

चांदवड तालुक्यात महिला मंडळ अधिकाऱ्याला ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. योगिता आनंद भोये असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ माजली आहे.

Krantee V. Kale

नाशिक : चांदवड तालुक्यात महिला मंडळ अधिकाऱ्याला ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. योगिता आनंद भोये असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची वडिलोपार्जित शेतीजमीन वादात अडकली होती. या प्रकरणी न्यायालयाने तक्रारदाराच्या बाजूने निकाल देत संबंधित जमिनीचा ताबा देण्याचे आदेश महसूल विभागाला दिले होते. त्यानुसार चांदवड तहसील कार्यालयाने जमिनीचा ताबा देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी मंडळ अधिकारी म्हणून योगिता भोये यांच्याकडे सोपवली होती. तथापि, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भोये यांनी सुरुवातीला ६० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. चर्चेनंतर ही रक्कम ५० हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबी पथकाने सापळा रचून योगिता भोये यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

MPSC परीक्षा घोटाळा प्रकरण : न्या. भोसले यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाकडून खुली सुनावणी

Mumbai : जमीन वादात खरेदीदारांवर अन्याय होऊ देणार नाही; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Mumbai : छठपूजेसाठी एक खिडकी योजना; मनपा आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश

वाहनतळाची जागा रिकामी करा; मुंबई मनपाचे नाट्यनिर्मात्या संघाला आदेश

उजनीच्या पाण्यावर डेटा सेंटरचा डोळा; आमदार रोहित पवार यांचा सवाल