नाशिकला आज ढगफुटीचा इशारा प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

नाशिकला आज ढगफुटीचा इशारा

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात मंगळवारी तीव्र ढगफुटी होण्याची दाट शक्यता असून, एकाच दिवसात तब्बल ३०० मिमी इतका विक्रमी पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Swapnil S

नाशिक : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात मंगळवारी तीव्र ढगफुटी होण्याची दाट शक्यता असून, एकाच दिवसात तब्बल ३०० मिमी इतका विक्रमी पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः याबाबतची माहिती देत नाशिक जिल्ह्याला सर्वात महत्त्वाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकचे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे अॅक्शन मोडवर आली आहे.

नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीची भीती असल्याने खबरदारी म्हणून उद्या नाशिक शहर वगळून ग्रामीण भागात त्र्यंबक आणि इगतपुरी भागात शाळा तसेच आठवडे बाजार पूर्णपणे बंद राहतील अशी घोषणा नाशिकचे जिल्हाधिकरी आयुष प्रसाद यांनी केली आहे. ते म्हणाले की, उद्या हवामान विभागाने ढगफुटीचा इशारा दिल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात जाणे टाळावे.

त्र्यंबकेश्वर देवस्थान तसेच सप्तशृंगी देवीचे मंदिर बंद उद्यापासून परवा सकाळपर्यंत बंद राहणार आहेत. जिल्ह्यातील दिंडोरी, नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी आणि पेठ तालुक्यांतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. पुढील आदेशापर्यंत पर्यटनस्थळेही बंद ठेवण्यात आली आहेत.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान ब्लॉक, पश्चिम रेल्वेचा दिलासा

Mumbai : चिंचपोकळीच्या चिंतामणीची पहिली झलक समोर; पारंपरिक रूपाने जिंकली भाविकांची मनं

बँक खाती वापरण्यास ममता बॅनर्जींना परवानगी नाही

डीलिमिटेशनबाबत सर्वपक्षीय बैठक घ्या; खर्गेंचे मोदींना पत्र

बड्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्रे; विजय वडेट्टीवार यांचा आरोप