Nashik : मतीन पटेल आज शरण येण्याची शक्यता 
महाराष्ट्र

Nashik : मतीन पटेल आज शरण येण्याची शक्यता

टीसीएस कंपनी धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय देणारा ‘एमआयएम’चा नगरसेवक मतीन पटेल याला नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने दणका दिला आहे.

Swapnil S

नाशिक : टीसीएस कंपनी धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय देणारा ‘एमआयएम’चा नगरसेवक मतीन पटेल याला नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने दणका दिला आहे. पोलिसांनी मतीन यास नोटीस पाठवून कारवाईचा बडगा उगारला आहे. प्राप्त माहितीनुसार, मतीन याने नोटीस मिळताच पोलिसांना शरण येण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी सोमवारचा दिवस निश्चित केला आहे. राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या नाशिकमधील ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणाचे थेट कनेक्शन छत्रपती संभाजीनगरशी असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला पोलिसांपासून लपवून ठेवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याप्रकरणी, एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याच्याभोवती पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.   

त्याच्या शोधार्थ नाशिक पोलीस पथक संभाजीनगरमध्ये गेले होते, मात्र, तो सापडला नव्हता. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर पथकाने पटेल यास नोटीस बजावल्यानंतर मात्र त्याने नरमाईची भूमिका स्वीकारली.

Gurugram Hit-and-Run : महिला बाईक रायडरला कारची जोरदार धडक; फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Mumbai : मेट्रो ९ टप्पा २ साठी विशेष वाहतूक ब्लॉक; १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान सकाळी वाहतूक उशीरा सुरू होणार

Jio-Airtel चा Vi ला दणका; मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीवरून TRAI कडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?

Mumbai : दादर पूर्व स्टेशन परिसर होणार कोंडीमुक्त; टॅक्सी, बेस्टसाठी स्वतंत्र मार्गीका, टॅक्सी स्टँड

परिचारिकांना महिन्याला आठ सुट्या द्या; राज्य शासनाच्या धर्तीवर ४० तासांचा आठवडा करा, परिचारिका संघटनेने BMC चे लक्ष वेधले